🙏🏻नमो बद्धाय🙏🏻
नाशिक शहरात नाशिक भिक्षू संघाचा वर्षावास चालू आहे , प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात बांधवांनी उपस्थित रहावे तसेच सर्व पौर्णिमा साजऱ्या कळवाव्यात या करिता नाशिक भिक्षू संघाच्या वतीने बुद्ध धम्माचा प्रचार , प्रसार होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात .
प्रत्येक पौर्णिमा ही बुद्ध विहारात साजरी केलीच पाहिजे या मोहिमअंतर्गत नाशिक च्या त्रीरश्मी बुद्ध लेणी या ठिकाणी जो नाशिक भिक्षु संघाचा वर्षावास चालू आहे. त्यांच्या वतीने सर्व नाशिक येथील सर्व उपासक उपासिका यांना उपकृत वा मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी श्रावण पौर्णिमा महोत्सव निमित्त पूज्य भदन्त नागसेन जी औंगाबाद यांची धम्मदेशना आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सर्वांनी नाशिक च्या त्रीरश्मी बुद्ध लेणी बुद्ध स्तूप या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक भिक्षु संघाच्या वतीने करण्यात येत आहे…
ठिकाण : बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी, पाथर्डी शिवार,
मुंबई आग्रा हायवे, नाशिक-४२२ ०१०.
9422261444, 7277773358, 7276509174
सर्वांचे जय मंगल होवो…😇😇😇
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार