तथागत बुद्धांच्या धम्माची व्याप्ती फार मोठ्ठी आहे , तथागत बुद्धानी आपल्या भिख्खू संघास अनेक भागात धम्म रुजवण्यासाठी पाठवलं , भारतात असा एकही प्रांत नाही जिथे बुद्धाचा उपदेश पोहचला नाही , वेरूळ , अजिंठा , कार्ला भाजे , सन्नती तेर ,खरोसा , पैठण, अमरावती अश्या अनेक ठिकाणी धम्म मनामनात रूजला , इथल्या डोंगरदऱ्या तून बुद्धं सरणं गच्छामी चा निनाद झाला , इथल्या डोंगरदऱ्यानी आपल्या कुशीत त्रिरत्नास सामावून घेतलं , इथल्या काळ्याकुट दगडांनी अनेक हातोडे सहन करून इथली बुद्ध संस्कृती आज पर्यंत जपून ठेवली , खरच आपण त्या अनामिक कलाकारांना धन्यवाद द्यायला हवेत ज्यांनी लेणी निर्माण करण्यासाठी आपले जीवन बुद्धाला समर्पित केलं , आता आपण जतन करू , संवर्धन करू !!!
ऐतिहासिक वारसा , बुद्ध लेणी खरोसा वर्षावास महोत्सव
रविवार दि 14 ऑगस्ट 2022
सकाळी – 9:30 पासून
स्थळ- बुद्ध लेणी खरोसा ता.औसा जि.लातूर
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
✍️ भंते सुमेधजी नागसेन ( तगर भूमी उस्मानाबाद )
9960498358
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा