😟 शोकांतिका 😣
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
▪️काही अज्ञानी पालकांमुळे बौद्ध धम्माची माहिती पुढच्या पिढीला पोहचत नाही.
▪️बौद्ध युवक – युवतींना स्वतःच्या धम्माची माहिती मिळविण्यात उत्सुकता नाही.
▪️अर्ध्यापेक्षा जास्त बौद्ध युवकांना स्वतः बौद्ध असल्याची नीट जाणीव नाही.
▪️बौद्ध धम्माचा प्रचार – प्रसार करायला आमच्या लोकांना लाज वाटते.
▪️सर्वधर्म समभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदू धर्माचा उदो – उदो करत फिरतात आणि बौद्ध धम्माकडे अक्षरशः पाठ फिरवितात.
▪️समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जर कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.
▪️शिर्डी, तिरुपती बालाजीला हजारो रुपये देऊन नवस करतील किंवा दान करतील पण बुद्ध विहारात किंवा फुले, शाहू, आंबेडकर यांचे विषयी प्रबोधनपर व्याख्यान मालेला देणगी न देता दहा वेळा विचार करतील पैसे देऊ की नाही. अनेक बहाणे सांगतील.
▪️घरात बौद्ध ग्रंथ व बाबासाहेब, फुले यांच्या विचार सरणीची पुस्तके तर नाहीच. वाचन, आचरणं तर दूरच राहिले.
▪️आपल्या समाजाच्या मीटिंगला जायला आम्हाला जमत नाही किंवा वेळच नसतो.
▪️आपले अनेक लोक फक्त लग्न, बारसे (नामकरणविधी), वाढदिवस बौद्ध पद्धतीने करतात लोक नांव ठेऊ नये म्हणून…. आणि पाया पडायला कुलदेवता, देवळात शिर्डीला जातात.
अश्याप्रकारे बौद्ध लोकांच अस्तित्व त्याच देशातून मिटण्याच्या मार्गांवर आहे ज्या देशात या धम्माचा उदय झाला.
तेंव्हा आता विचार करा की, आमच्या मुलांना बुद्ध, बाबासाहेब कुणी सांगायचा? आणी मग आपण इतर अधर्मीय बौद्ध बनवायचे सोडा, पण बौद्ध धम्म घेतलेल्या लोकांना बुद्धिस्ट कसे बनविणार ?
शब्दाकंन/लेखन –
हंसराज कांबळे, नागपूर
🌹🌹🙏🙏🌹🌹
More Stories
बुध्द विहार आचारसंहिता… Adv Shankar Sagore.
तथागताचे अंतिम भोजन – राहुल खरे
मानवी समाजाला उपयुक्त ठरणारी मैत्री भावना – डॉ. बालाजी गव्हाळे