July 29, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अजिंठा – मानवी अविष्काराला पडलेले एक सुंदर स्वप्न……

भ.बुद्धांच्या मानव कल्याणाच्या सम्यक मार्गाचा पदोपदी आठवण करून देणारे शिल्प! इथे येताच तुमच्यातील “स्व” गळून पडल्याशिवाय राहत नाही. भारतातील सर्वात प्राचीन चित्र आहेत ही! एक एक चित्र पाहताना आपण हरखून जातो. त्या अनामिक कलाकारांना मनोमन नमस्कार केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकणार नाहीत. म्हणूनच देश विदेशातील अनेक कलाकारांना, अभ्यासकांना, संशोधकांना आणि माझ्या सारख्या विद्यार्थ्याला अजिंठा भुरळ घालते. तुमचे सर्व सुख दुःख विसरायला लावण्याची ताकत या अजिंठा शिल्पकलेत आहे.
या चित्रांशी, शिल्पाशी ज्यावेळेस तुम्ही एकरूप व्हाल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही “ध्यानस्थ” व्हाल. 28 एप्रिल 1819 रोजी प्रथमच सापडलेल्या या लेणींच्या शोधाला आज 203 वर्षे होतायेत.
या लेणीं समूहात राहणारे बौद्ध भिक्खू, ते अनामिक कलाकार, ते सर्व दानशूर राजे आणि या लेणींचा शोध घेणारा कॅप्टन जॉन स्मिथ या सर्वांना मनापासून वंदन
अतुल भोसेकर
९५४५२७७४१०