November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

महाप्रजापती महिला संघ आयोजित भिम महोत्सव 2022

महाप्रजापती महिला संघ आयोजित राजगृह बुध्द विहार,राजीव नगर वसाहत नाशिक

नाशिक भिम महोत्सव 2022 निमित्त सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दिनांक 1 एप्रिल पासून दररोज सायंकाळी 7 ते 9 यावेळेत विविध गुणात्मक स्पर्धा स्पर्धा सुरु आहे.त्यापैकी चौथी स्पर्धा वेशभूषा संपन्न झाली. सदर वेशभूषा स्पर्धेत सहभागी धम्म संस्कार वर्गाचा विद्यार्थी छोटा बालक स्वराज प्रमोद नरवाडे याने बाबासाहेबांच्या पोशाखात दमदार वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधन घेतले.

 

 

धम्मकाया नाशिक युनिटचे श्रद्धावान उपासक प्रशांत उन्हवणे सर यांची ही गोड, गुणी कन्या… सावित्रीमाईची वेशभूषा करून आधुनिक सावित्रीच्या लेकींना शिक्षणाचा संदेश देत आहे. नुसते केवळ उच्चशिक्षित होणे म्हणजेच पूर्ण शिक्षण नव्हे तर आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग हा महापुरुषांच्या विचार प्रसारासाठी तसेच समाजातील अजूनही जे घटक शिक्षणापासून दूर आहे त्यांना मुख्यप्रवाहात आणन्यासाठी करणे आवश्यक आहे. पूर्वीची स्त्री जशी चूल व मूल एवढीच सिमित होती मात्र आजची शिक्षित स्त्री सुद्धा टीव्ही व मोबाईल अशीच गुरफटून गेलेली आहे. त्या समस्त महिलांना ही छोटी सावित्री त्या महान सावित्रीमाईच्या क्रांतिकारी धगधगत्या जिवन कार्याची एक प्रकारे पुन्हा आठवणच करून देत आहे