पितळखोरा लेणीतील भग्न शिल्पांची व्यथा मागील काही वर्षापासून आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून अनेक मित्रांच्या समोर मांडत आलोय त्यामुळे अनेकांच्या ती कानापर्यंत पोहचली तर काहींच्या ह्रदयापर्यंत , पितळखोरा लेण्यातील भग्न शिल्पांची व्यथा ज्यांच्या ह्रदयापर्यंत पोहचली त्यापैकी दोन धम्म बांधव मित्र म्हणजे डॉ Sanjay Paikrao सर आणि DrDhammapal Mashalkar सर.
दोन्ही धम्म बांधव मित्रांनी पुन्हा पितळखोरा लेणीतील भग्न शिल्पांची व्यथा मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल दोघांचेही मनापासून…..धन्यवाद !
२५ आणि २६ मार्च रोजी औरंगाबादेतील कन्नड तालुक्यात कला, शिल्प आणि स्थापत्यावर दोन दिवसांची परिषद होत आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत तरी ज्यांना ज्यांना ज्ञानाची भूक आहे त्यांनी नक्की या संधीचा फायदा घ्यायचा आहे. मागच्यावर्षी ही परिषद नांदेड इथे भरवली होती यंदा ती कन्नडमध्ये होत आहे पुढच्या वर्षी ती इतरत्र होईल त्यामुळे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या, मागच्या वर्षी ७ मार्च रोजी काही मोजक्या मित्रांच्या बरोबर लेणीवर उपस्थित होतो यंदा विद्वानांच्या गोतावळ्यासह २६ तारखेला सकाळी लवकरच ८ ते ११ या दरम्यान पितळखोरा लेणीवर असणार आहे.
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
२४/३/२०२२
More Stories
एक दिवसीय समाधी साधना शिबिर One-day Meditation Retreat in Mumbai
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
दिवाळी ही बौद्ध पद्धतीने साजरी करावी. Diwali should be celebrated in this Buddhist way.