सम्यक सांस्कृतिक संघ च्या माध्यमातून दि ३/४/२०२२ रोजी रविवारी सकाळी ठीक १०.३० वाजता कोंडीविटे लेणी ( महाकाली गुफा अंधेरी , मुंबई ) इथे एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला गेला आहे.
कोंडीविटे लेणी अभ्यास दौऱ्याला मार्गदर्शक म्हणून लोकप्रभाचे ख्यातनाम संपादक व बौध्द धम्म अभ्यासात सुवर्णपदक प्राप्त केलेले माननीय विनायक परब सर हे उपस्थित राहणार आहेत.
अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून जनमानसात लेण्यांच्या संदर्भात आता बर्यापैकी जनजागृती झाली आहे पण पुढे काय ?
मुंबईतील कान्हेरी आणि कोंडीविटे लेणी नंतर तिसर्या बौध्द लेणीचे काय झाले ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कोंडीविटे लेणी अभ्यास दौर्यात मिळणार आहे , दौरा निःशुल्क असल्याने मुंबईकरांची संख्या मोठी असायला हवी तसेच उपनगरातील आणि बाहेरील जिल्ह्यातील जिज्ञासू सदस्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी.
समविचारी संघटना आणि समविचारी मित्रांनी या लेणी चळवळीच्या पुढच्या टप्यात खांद्याला खांदा लावून साथ द्यावी.
अभ्यास दौर्यात समाविष्ट होण्यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही एका व्हॉट्स अप क्रमांकावर आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे कृपया फोन करू नये ही विनंती.
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
२४/३/२०२२
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा