दिनांक २ मार्च २०२२ रोजी काळाराम मंदिर परिसरात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
देश-विदेशातील तरुणांसाठी नुकतेच लॉन्च झालेले जयभीम शॉर्ट व्हिडीओ अँप यांच्या तर्फे काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापन दिवसाचे औचित्य साधून लोकशाहीर संभाजी भगत यांचा लाईव्ह जलसा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे बहुजनांना वंचितांना , समाज प्रबोधनपर गाणे ऐकायला मिळणार आहे.
नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह व प्रवेश ही भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना आहे. काळाराम मंदिराचा संघर्ष / सत्याग्रह हा सवर्णांच्या मंदिरात बहुजनांना प्रवेश मिळावा, इतरांप्रमाणे वंचित उपेक्षित घटकांना ही मंदिर प्रवेश मिळावा, त्यांना त्यांचा अधिकार मिळावा याकरिता करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून नाशिकमधील पंचवटीत असलेल्या काळाराम मंदिरात केवळ उच्चवर्णिय लोकांनाच मंदिरात प्रवेश करून पाठ-पूजा करण्याची परवानगी होती.
अशा परिस्थितीत बहुजनांना या मंदिरात प्रवेश मिळावा याकरिता भारतीय संविधानाचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी एक व्यापक आंदोलन छेडले.
बाबासाहेब उद्गारले, “ही फक्त मंदिर प्रवेशाची लढाई नाही तर आपल्या हक्काचा व समानतेची लढाई आहे”
कारण मंदिराच्या आत देव नाही हे आम्हाला माहीत आहे , तिथे देवाच्या नावावर समाजाला लुबाडणारे भाट आहेत.
या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिवशी दिनांक २ मार्च २०२२ रोजी काळाराम मंदिर परिसरात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
देश-विदेशातील तरुणांसाठी नुकतेच लॉन्च झालेले जयभीम शॉर्ट व्हिडीओ अँप यांच्या तर्फे काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापन दिवसाचे औचित्य साधून लोकशाहीर संभाजी भगत यांचा लाईव्ह जलसा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे बहुजनांना वंचितांना , समाज प्रबोधनपर गाणे ऐकायला मिळणार आहे.
नुकतेच अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या हस्ते लॉन्च झालेले जयभीम शॉर्ट व्हिडीओ अँप हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानता आणि जातीविहित समाज या सिद्धांतावर बनवला गेला आहे. या अँप ची विशेष बाब म्हणजे हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून याद्वारे मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येणार आहे. शिक्षण, उदयोग-व्यवसाय आदींवर विशेष लक्ष या अँपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
देशातील युवा वर्गात कमी काळात अतिशय वेगाने लोकप्रिय होणारे जयभीम अँप हे लॉन्च होताच २४ तासांच्या आत २ लाख लोकांनी डाउनलोड केलेले होते. ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.
तरुण पिढीमध्ये या अँप ची क्रेज इतकी वाढली की या अँपचा सर्व्हर क्रॅश झाला. परंतु अँपवर लक्ष ठेवून असलेल्या टेक्निकल टीमने ४८ तासांच्या आत ही समस्या दूर केली आणि अँप वर नियंत्रण मिळवले. जवळजवळ ५०,००० व्हिडीओ या अँप वर अपलोड करण्यात आले होते.
जयभीम अँप तर्फे काळाराम मंदिर प्रवेश संघर्ष त्यानंतरच्या घटना आणि इतिहासात नमूद केलेला अध्याय या सर्वांची आठवण करून देत लोकशाहीर संभाजी भगत यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम नाशिक नगरीत पार पडणार आहे. आमच्या सोबत तुम्ही ही या ऐतिहासिक क्षणाचे साथीदार बना… 🤝 आणि या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा…!
दिनांक :- २ मार्च २०२२
वेळ :- सायं. ६.२० ते ९.०० पर्यंत
पत्ता :- गोल्फ क्लब, काळाराम मंदिर जवळ, नाशिक.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा