February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

माता रमाई यांची १२४ वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साजरी करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा ,पुणे जिल्हा (पूर्व) अंतर्गत, तालुका शाखा दौंड व दौंड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने,
माता रमाई यांची १२४ वी जयंती, राजगृह बुद्ध विहार, दौंड शहर या ठीकाणी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दु- ३:०० वाजता साजरी करण्यात आली.

प्रवचनकार :- आद.सुजाताताई ओहाळ,केंद्रीय शिक्षका,भारतीय बौद्ध महासभा, -पुणे जिल्हा पुर्व.महिला उपाध्यक्षा यांनी त्यागमुर्ती रमाई माता आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.
या प्रसंगी भा.बौ. म.स पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष आद रघुनाथ साळवे गुरुजी यांनी . ऊपासिका शिबिराचे मेणबत्ती प्रज्वलित करुन उद्घाटन केले.
आद.मोहन रोकडे. संस्कार उपाध्यक्ष ‘दौंड तालुका पालकमंत्री,आद.राजरतन थोरात,सरचिटणीस,आद.सुनिताताई रोकडे, महिला सचिव.
आद.अरुणदादा सोनवणे प्रचार/पर्यटन उपाध्यक्ष. आद वामन वाघमारे.संस्कार सचिव. आद.आर.डी .गायकवाड जिल्हा संघटक या जिल्हा पदाधिकारी तसेच आद.श्रीकृष्ण मोरे सुमेध मौर्य दौंड तालुका अध्यक्ष.आद.श्रीकांत शिंदे. माजी शहराध्यक्ष दौंड यांनी शिबिर्थींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.बि.वाय जगताप. दौंड शहराअध्यक्ष हे होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ.भिमराव मोरे. दौंड शहर सरचिटणीस यांनी केले.
उपस्थितांचे आभार आयुनि. कांचनमाला धेंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजगुरु बुद्ध विहार अध्यक्ष आद.राजेश मंथने, काॅम्रेड अनिल धेंडे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.