२२ जानेवारी २०२२. महान बौद्ध भिक्कु थिक नाथ हन्ह यांचे निर्वाण…
—बौद्ध धम्माचे एक जागतिक कीर्तीचे मार्गदर्शक हरपले.
जगामध्ये ‘सोशली एंगेज बुद्धिजम’ च्या माध्यमातून क्रांती आणणारे महान बौद्ध भिक्कु थिक नाथ हन्ह यांचे आज २२ जानेवारी २०२२ ला निर्वाण झाले. सर्व प्रथम त्यांच्या कार्याला सलाम आणि त्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन!!!
एक गुरू, लेखक,कवी आणि जागतिक किर्तीचे शांतीचा मार्ग प्रस्थापित करणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते.
थिक नाथ यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९२६ ला व्हीएतनाम येथे झाला. सोळाव्या वर्षी त्यांनी झेंन मॉनेस्ट्रीमध्ये ते सहभागी झाले. १९४९ मध्ये ते पूर्णतः भिक्कु जीवनामध्ये सामील झाले. जागतिक स्तरावर त्यांना ‘ थिक नाथ हन्ह’ म्हणून ओळखले जाते. ‘थिक’ या शब्दाचा अर्थ म्हणजे ते शाक्य कुळाचा एक भाग आहेत.
१९६० मध्ये त्यांनी सायगाव येथे स्कूल ऑफ यूज फोर सोशल सर्विसेस नावाची संस्था काढली. ज्या मार्फत व्हीएतनाम मधील युद्धात नुकसान पोचलेल्या गावात शाळा, दवाखाने आणि पूर्ण गाव पुनः वसविण्याचे काम केले त्या साठी त्यांनी जमीनीवरती काम करणाऱ्या स्वयंसेवकांची वरील संस्थामार्फत टीम उभी केली.
जगातील महत्वपूर्ण विद्यापीठात आपले व्याख्यान देताना त्यांनी युद्धात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून भर देत, जुनीयर मार्टिन ल्युथर किंग यांना आग्रह केला की व्हिएतनाम मधील युनायटेड स्टेट्स चे शासन काढुन घ्यावे. २६ जानेवारी १९६७ ला ते नोबेल पिस प्राईज यासाठी नॉमीनेट झाले होते.
जगभरात त्यांचे अनेक दौरे झालेत. अनेक राजकीय, धार्मिक व सामान्य नागरिकांनी त्यांचे धार्मिक, माईंडफुलनेस प्रॅक्टिस अंगीकारले आहे. पश्चिमात्य देशात त्यांनी अनेक ठिकानी भिक्कु साठी प्रॅक्टिस सेंटर व विहारे निर्माण केले आहेत. लोटस इन सी ऑफ फायर हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले व त्यांनी या माध्यमातून जगभरात एंगेज बुद्धिजम / सोशली एंगेज बुद्धिजम ही व्याख्या जगभरातील लोकांना समजावून दिली.
तुम्ही करुणामय भाव ठेऊन जगातील समाजाला भेडसावणारे गरिबी, शिक्षण , मानव अधिकार तसेच स्वतःच्या वयक्तिक जीवनातील प्रश्न कसे हाताळू शकतात हे त्यांनी लोकांना समजावून दिले. बौद्ध धर्मातील महत्वपूर्ण तत्व सामाजिक जीवनात कसे अंगीकारले पाहिजे याबद्दल त्यांनी नेहमी प्रचार केला. त्यांच्याच चळवळीचा भाग म्हणून चीन,अमेरिका, श्रीलंका मध्ये एंगेज बुद्धीजमच्या चळवळीकडून प्रेरणा घेऊन अनेक चळवळी निर्माण झाल्या. दलाई लामा नी नंतर या गोष्टींची नोंद घेतली व जगभरातील अनेक संघटना या चळवळीत काम करत आहे.
अश्या या महान भिककुस विनम्र अभिवादन!!!
Waking up this morning, I smile. Twenty-four brand new hours are before me. I vow to live fully in each moment and to look at all beings with eyes of compassion.
—-Thich Nhat Hanh
–मैत्रेय दिपक
जागतिक बुद्ध धम्म दिक्षा समिती.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?