July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“महात्मा जोतीराव फुले” यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.!!

“महात्मा जोतीराव फुले” यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.!
……………….
महात्मा जोतीराव फुले ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते तसेच एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे पुणेकात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांच्या कंपनीने केली.

महात्मा जोतीराव फुले यांचे ‘सत्यशोधक’ कार्यकर्ते आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदार राजू बाबाजी वंजारी यांनी ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’च्या माध्यमातून मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’च्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले यांचे सत्यशोध‌ स्नेही व कार्यकर्ते यांनी केलेली आहेत. धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक ‘सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ’ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.

एवढंच नव्हे तर जेव्हा, ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे’ कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ,उद्योगपती, करोडपती असलेले महात्मा जोतीराव फुले हे १८९० साली मरण पावतात तेव्हा, त्यांच्या पार्थिव शरीराला कर्मठ वैदिकब्राम्हण त्यांच्या चितेला अग्नी देवू देत नव्हते. कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा यशवंत तो दत्तक घेतलेला असतो. यशवंत त्यांचा मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण ब्राह्मणपुरोहित व फुले यांचे जातभाई यशवंताला मागे ढकलून देत कारण की, “धर्म बुडेल”, ‌हा खेळ बराच वेळा चालला. महात्मा फुले यांचा पार्थिव पडून आहे तर त्याला शेवटच्या क्षणी देखील वैदिक ब्राह्मणी धर्मग्रंथ आडवा आला. शेवटी सावित्रीमाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.

*विचार करा !!*
जीवंतपणी महात्मा जोतीराव फुले यांचा पदोपदी अपमान तिरस्कार वैदिकब्राह्मणी मनुवादी लोकांनी केला पण मेल्यावरही महात्मा फुले त्यांच्या जातीतील लोकं ब्राह्मणांच्या बरोबरीने जोतीराव फुले यांच्या पार्थिव शरीराची विटंबना करतात यावर फुले अनुयायी बहुजन विचार करतील काय?

दुसरी एक घटना अशी की महात्मा फुले यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती. अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही. अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही.

अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली तेव्हा तीचं प्रेत तसेच पडून होतं पण अंतविधी करायला पुढे कोणीही आले नाही. दिवसभर ते प्रेत सडत आहे, त्याचा वास येतोय, जोतीरावांचे नातेवाईक किंवा त्यांच्या जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही. शेवटी पुणे नगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला.

*विचार करा !!!*
एकेकाळी करोडपती असलेले जोतीराव फुले ज्यांनी बहुजन समाजाला ब्राह्मणी मनुवादी गुलमगीरीतुन मुक्त करण्यासाठी आपल्या स्वकष्टाने कमावलेली संपत्ती मुक्त हस्ते खर्चून टाकली. जर त्यानी फक्त आपला घरपरिवार पाहिला असता तर त्यांच्या पुण्यातील गंजपेठेतिल घरावर सोन्याचे छत असतं आणि यदाकदाचित बहुजन समाजाच्या कोटी कोटी कुळाचा उद्धार करणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर देखील मिळाला नसता.

*विचार करा !!!!*
आम्ही शिकून कर्मचारी अधिकारी बनावे यासाठी फुल्यांनी जीवनाची माती केली पण त्यांचा व त्यांच्या नात्यातिल लोकांचा शेवट हा व्हावा ही आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई पतिपत्नी यांच्या त्याग बलिदान आणि समरपणातू आज बहुजन लोक मान सन्मान आणि स्वाभिमानाचे जीवन जगत आहेत परंतु आम्ही “यहसान फरामोश” आमच्या घरात त्यांचा फोटो लावत नाही, त्यांची पुस्तके वाचत नाही. वाचली तरी समजून घेत नाही. समजून घेतली तरी कृती आणि कार्यात उतरून घेत नाही अर्थात आम्ही किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार आज त्यांना अभिवादन करताना केला पाहिजे…!!!
……………
संदर्भ- किशन सूर्यवंशी यांच्या महात्मा फुले यांचे खरे वारसदार कोण? या पुस्तकातून … तसेच
[(संदर्भ 1) आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993 ,(2) महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998.(3) महात्मा फुले – समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991]…
संग्रहित mn sonawane pune
……………