July 31, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

लोक बाबासाहेबांचे दैवतीकरण करत आहेत…?

लोक बाबासाहेबांचे दैवतीकरण करत आहेत…?

उदा :
1) निळा फेटा बांधणे
2) निळा टीळा लावणे
3) निळा भडक जय भीम
4) निळ वादळ-भिमाचा वाघ- निळ रक्त-निळा वाघ- कडक जय भीम-जयभिमची पोर-महार आसल्याचा अभिमाण आसे शब्द वापरणे
5) बाबासाहेबांना वाघाचे तोंड दाखवणे
वगैरे वगैरे

आपले बांधव हिंदूची कॉपी करण्याच्या नादात बाबासाहेबांचे विद्वत्तेचे विद्रुपिकरण करत आहेत
जगांत सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला कारण
आपल्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावे हया करीता.
परंतु आपण हे नाही समजलो धम्म म्हणजे काय ?
बाबासाहेब कधी भडक निळा कलर टीळा लावून फिरले का ?
त्यांना फेटा बांधायला ते काय शाहीर होते का ?
अतीउच्च दर्जाचे राहणीमान ही बाबासाहेबांची ओळख होती. ह्याचे कारण समाजाने अनुकरण करावे म्हणून.
अजून एक

आपले काही लोक छाती फुगवून सांगतात मी जय भीम वाला.
त्यांना हे कळत नाही की बौद्ध ही वेगळी ओळख बाबासाहेबांनी आपल्याला दिली… मुस्लीम कधी सांगतात का मी अस्सलाम अलैकूमवाला आहे ?
शिख म्हणतात का सतश्रीएकालवाला आहे ?
अभिमान हा आचार, विचारात आणि राहणीमान ह्यात दाखवावा.
धम्माची ऊंची बासाहेबांनी त्यांच्या ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथातुन अतिशय सुरेख पणे लिहिली आहे. हा बुद्ध धम्म आपल्या जीवनामधे अनुसरला तर आपलेच काय संपूर्ण जगाच कल्याण होऊ शकत. धम्मामधे इतकी प्रचंड क्षमता आहे. आपण बुद्धिष्ठ आहोत ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. अरे सांगा जगाला छातीठोक पणे मी बुध्दीष्ठ आहे आणि हयाचा मला अभिमान आहे.

माझे पूजन करू नका
पण माझे अधुरे राहीलेले कार्य पूर्ण करा

डॉ-.बाबासाहेब आंबेडकर .