November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक –४८

यावरून हे स्पष्ट होते की ब्राम्हणशाहीचे बौद्ध धर्मावरील आक्रमण हे मुस्लिमांच्या हिंदू धर्मावरील आक्रमापेक्षा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कितीतरी अधिक महत्वाचे आहे.परंतु मौर्यानी निर्माण केलेल्या साम्राज्यावरील आक्रमणाला इतिहासात फारच थोडी जागा दिली आहे. त्यातही शुंग,कण्व,आणि आंध्र हे कोण होते व त्यांनी मौर्याणी निर्माण केलेले साम्राज्य का नष्ट केले,या सहज निर्माण होणाऱ्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचप्रमाणे बौद्ध धर्माविरुद्ध विजय मिळविल्या नंतर ब्राम्हणशाहीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या बदलांचा अभ्यास त्यांनी केलेला नाही.

भारतीय इतिहासाच्या या अंगाचा विचार करण्यातील या अपयंशाच्या मागे अस्तित्वात असलेल्या काही चुकीच्या कल्पना आहेत.सर्वसामान्यपणे असे समजले जाते की या भारताच्या सांस्कृतिच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या .त्यांच्यात मूलभूत विरोध कधीच नव्हता असे समजले जाते.दुसरी गैरसमजूत अशी आहे की भारतीय इतिहासात जे संघर्ष झाले,ते सर्व राजकीय आणि राजघराण्यातील संघर्ष होते.त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी काहीही संबंध नव्हता.या अगदी चुकीच्या कल्पना मुळे भारतीय इतिहास हा पूर्णपणे यांत्रिक बनला.तो एका राजघराण्यानंतर दुसरे राजघराणे आणि एका राजा नंतर दुसरा राजा शासन सत्तेवर आरूढ होणे या स्वरूपात लिहिला गेला.ही लेखनाची प्रवृत्ती सुधरावयांची असेल तर प्रथम दोन निर्विवाद सत्ये स्वीकारावी व समजून घ्यावी लागतील.

पहिली गोष्ट ही की भारतात कोणतीही एकमेव व एकच एक एक समान संस्कृती कधीच नव्हती.ऐतीहासीकदृष्ट्या तीन भारत होते.पहिला ब्राम्हणांचा भारत, दुसरा बौद्ध धर्मीय भारत व तिसरा हिंदू भारत.या प्रत्येकाची स्वतःची अशी संस्कृती होती.दुसरी गोष्ट अशी की भारतावरील मुस्लिम आक्रमनापूर्वी ब्राम्हणशाहीत‌ व बौद्ध धर्म यात मरेपर्यंत अतिशय तीव्र संघर्ष झाला होता.जो या दोन गोष्टी लक्षात घेणार नाही त्याला भारताचा खरा इतिहास कधी लिहिताच येणार नाही.त्याला या इतिहासात अंतर्भूत असलेला अर्थ व कार्यकारणभाव समजणार नाही.आतापर्यंत भारताचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला,त्यात सुधारणा करण्याच्या आणि इतिहासाचा अर्थ व उदिष्ट समजून देण्याच्या दृष्टीनेच ब्राम्हणशाहीच्या‌ बौद्ध धर्मावरील आक्रमणाच्या व ब्राम्हणशाहीच्या बौद्ध धर्मावरील राजकीय विजयाच्या या इतिहासाची मला पुनर्रचना करणे मला भाग पाडले.

त्यामुळे पुष्य मित्राची क्रांती ही ब्राम्हणांनी बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी केलेली राजकीय क्रांती होती हे मान्य करावे लागेल.
जीज्ञासु हा प्रश्न सहज विचारतील की ब्राम्हणवादाने विजयी झाल्या नंतर काय केले.?
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
🇸🇴🇸🇴🇸🇴