November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

21 ते 30 सप्टेंबर आनापान सति आणि विपस्यना शिबीर

21 ते 30 सप्टेंबर आनापान सति आणि विपस्यना शिबीर
दररोज सायंकाळी 7 ते 8-30 घर बसल्या,ऑनलाईन वर्षावासा निमित्त ध्यान व ज्ञान शिबीर
🙏🙏
महोदय /महोदया
ध्यानसाधना म्हणा की विपश्यना तुमच्या मनाला स्थिरता आणि शांतता देते.
या स्थिरतेचा शांततेचा आपल्या कार्यक्षमतेवर खूप चांगला परिणाम व्यक्तिशः कोट्यावधी लोकांनी अनुभवला आहे.

या साधनेने एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढल्याने खूप छानशी कामे वेगाने पार पडतात.

मन शांत झाल्याने सकारात्मक भावना वाढण्यास मदत होते जी आजच्या नैराश्य जनक विचित्र काळात खूप खूप आवश्यक आहे.

अनेक वेळा आयुष्यात बरे वाईट प्रसंग उद्भवतात ज्याने सामान्य माणसाचे मन अस्वस्थ होते, सैरभैर होते… नाना तर्हेचे भीतीदायक विचार मनात थैमान घालू लागतात, झोप लागत नाही, जीवनात स्वारस्य नाही असे वाटू लागते, ही सर्व नैराश्याची लक्षणे आहेत …

अशावेळी अनेक लोक अनेक बोलघेवढे सल्ले देतात, परंतू नुसत्या विचारांनी काही साध्य होत नाही, प्रत्यक्ष कृतीला दुसरा पर्याय नाही, मग काय करायला हवे, मनावर नियंत्रण मिळवायला हवे!
मनावर नियंत्रण मिळवल्यास विचारांचा कोलाहल थांबतो, रक्तदाब स्थिरावतो आणि निर्णय क्षमता वाढीस लागते परिणामी अनेक अनर्थ टळतात.

तथागत बुध्द्धांनी दिलेली ही साधना आपण वैयक्तिक रित्या देखील करू शकता इतकी सोपी आहे!

परंतू कुणी निष्णात असा निर्देश देणारा, तसेच आपल्यावर लक्ष ठेवणारा मार्गदर्शक उपलब्ध असेल तर ही अत्यंत प्रभावी विद्या चांगल्या तऱ्हेने समजते , ध्यान देखील फार चांगल्या रीतीने लागते. सुदाम वाघमारे सारखे मार्गदर्शक लाभल्यास लाभच लाभ पदरात पडतो.
AIM2-आंबेडकराइट इंटरनॅशनल मीडिया आणि मूव्हमेंट्स संस्थेतर्फे
आम्ही 21 ते 30 सप्टेंबर सायंकाळी 7 ते 8-30 या वेळेत रोज एक तास आनापान सती ह्या तंत्राचा
‼️ऑनलाईन ‼️अभ्यास करून घेणार आहोत.

तेव्हा ज्या कुण्या नवीन साधकांस या अद्वितीय साधनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी
आपले
1नांव…………
2 वय……….
3 पत्ता,………
4 व्हाट्सअप नंबर,………
पूर्वानुभव…………..

इत्यादी माहिती, एकाच post मध्ये
आमच्या खालील whatsap क्रमांकावर पाठवावी,

छ भा भालेराव
9657191775
दर्शना मेश्राम
8097933358
अभिज्ञा जांभुळकर
7776071363
सुदाम वाघमारे
8591878183,
8828484446
या क्रमांकावर माहिती पाठवावी

या शास्त्रशुद्ध साधनेचा लाभ घेण्यास कुठल्याही जाती धर्माचे बंधन नाही.
शिवाय हा उपक्रम विनामूल्य आहे!
आजच्या नैराश्य जनक परिस्थितीत आपल्याशी संबंधित माणसांचे मनोबल वाढवणे नितांत आवश्यक आहे.
तेव्हा सर्वाना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती!