September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

 वर्षवासातील दूसरी महत्वपूर्ण श्रावण पौर्णिमा

 वर्षवासातील दूसरी महत्वपूर्ण श्रावण पौर्णिमा नाशिकच्या त्रिरश्मी बुध्दलेणी या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी नाशिक शहरातील विविध परिसरातील बुध्दविहारात वास्तव्य करणाऱ्या भिक्खू भिक्खूनी संघाला भोजनदानासाठी आमंत्रित करून त्यांना भोजनदान देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिक्खू संघाचे संघनायक पुज्य भन्ते यु नागधम्मो हे होते.तर नाशिकरांच्या आमंत्रणावरुन खास औरंगबादहून यावर्षी वर्षावासासाठी आलेले पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)यांची या कार्यक्रम माला प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुध्द व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून भिक्खू भिक्खूणी संघाने परित्राणपाठ केले.व अखिल विश्वातील प्राणीमात्राला मंगल मैत्री दिली.यावेळी
भिक्खू भिक्खूणी संघाच्या हस्ते वृक्षारोपण करून धम्मसेवा देणाऱ्या धम्मसेवक सेवीकांचा सत्कार देखील करण्यात आला. भिक्खू संघाच्या धम्मदेसने नंतर उपासक उपासिकांच्या वतीने धम्मातील विनयानुसार भिक्खू भिक्खूणी संघाला आर्थिकदान, अष्टपुरस्कार,फलाहारदान आदी.संघदान करण्यात आले
आजच्या सर्व दानदात्यांचे(उपासिका जयश्री पी. कुमार धनविजय, उपासिका लताताई ज्ञानेश्वर गांगुर्डे व उपासक अरुण शेजवळ( अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंच व इतर )भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने विशेष आभार व अभिनंदन!
बुध्द धम्म संघाच्या प्रतापाने आपल्या सर्वांचे मंगल होवो.