August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -३५

वेदांत सूत्राचा हा उगम आहे.हा बादरायण कोण होता ? त्याने ही सूत्रे कशासाठी रचली ? त्याने ती कधी रचली ? नावाशिवाय बादरायण ची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.ते लेखकाचे नाव खरे आहे की नाही हे ही निश्चित नाहीं. या सूत्राच्या लेखाकाबाबंत प्रमुख भाष्यकारातही एकमत नाही.काही जण लेखक बादरायण आहे असे मानतात,तर काही जण असे म्हणतात की व्यास आणि बादरायण ही एकच व्यक्तीची नावे आहेत.अशा प्रकारे या सूत्राच्या लेखकाबाबत आश्चर्यकारक परस्परविरोधी मते आढळुन येतात.बादरायणाने सूत्रे कशासाठी लिहिली ?

ब्राम्हणानी वैदिक साहित्यातील कर्मकांडाचे सुसूत्रीकरण. करावे यासाठी ती लिहिली असावीत हे आपण समजू शकतो.ब्राम्हणांना कर्मकांडाचे महत्व फार वाटे.वैदिक साहित्यातील कर्मकांडाच्या सुसूत्रीकरणावर त्यांची उपजीविका व जीवन अवलंबून होते.परंतु ब्राम्हणांना वैदिक. वाड्:मयातील ज्ञानकांडात काहीही रस नव्हता .मग त्याची शास्त्रशुद्ध मांडणी कशासाठी केली ? हा प्रश्न आता पर्यंत कोणी उपस्थित केला नाही.परंतु हा प्रश्न महत्वाचा आहे व त्याचे उत्तर ही महत्त्वाचेच असले पाहिजे.हा प्रश्न का महत्वाचा आहे व त्याचे उत्तर काय आहे याची चर्चा मी नंतर करीन.वेदांत सुत्राबाबत आणखी दोन प्रश्न आहेत. ही सूत्रे (ईश्र्वरविषयक ) आहेत की शुद्ध तत्वज्ञानाच्या स्वरूपाची आहेत ? की प्रस्थापित ब्रम्हज्ञानविषयक सिद्धांताची शुद्ध तत्वज्ञानाशी सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता व या प्रकारे त्यांना निरुपद्रवी बनविण्याचा प्रयत्न होता ? दुसरा प्रश्न वेदांत सुत्रावरील भाष्यासंबधी आहे. वेदांत सूत्रावर पाच भाष्ये पाच ख्यातनाम आचार्यांनी लिहिली आहेत.त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या कीर्ती मुळे त्यांना आचार्य ही पदवी मिळालेली होती.ही पाच भाष्ये यांची – १) शंकराचार्य ( ई.स. ७८८ ते ८२०),२) रामानुजाचार्य, (ई.स. १०१७ ते ई.स.११३७), ३) निंबारकाचा र्य ( मृत्यू ई.स. ११६३).४) माधावाचाऱ्या (ई.स.१९९७ ते अंदाजे १२७६ ), आणि ५) वल्लभाचांर्या (ई.स.१४१७).
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹