August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -३३

 

ब्राम्हणावर अन्याय झाल्याचा कोणताही पुरावा नाही.याउलट असा पुरावा उपलब्ध आहे की, बौद्धांच्या सत्तेच्या काळात ब्राम्हणांना उदारतेने वागविले जात होते.वृषल या शब्दाचा अर्थ ‘ असंस्कृत ‘ असा आहे.त्यामुळे वृषलं हा उल्लेख बहुधा मुस्लिम आक्रमकासाठी केला असावा.
२३. वन पर्वातील याच अध्यायात ६५,६६,६७ या श्लोकात असे म्हटले आहे की, ‘ समाज विस्कळीत बनेल.लोक ऐडुकांची पूजा करतील.ते देवावर बहिष्कार घालतील .शूद्र द्वीजांची सेवा करणार नाहीत.सर्व जग एडूकमय होईल.युग समाप्त होईल.
२४. यातील एडूक या शब्दाचा अर्थ काय ? काही जणांच्या मते एडुक म्हणजे बौद्ध धर्मीय चैत्य होत.परंतु कोसंबी यांच्या मते हे चुकीचे आहे.बौद्ध साहित्यात वा वैदिक साहित्यात कोठेही ‘ एडूक ‘ या शब्दाचा उपयोग चैत्य या अर्थाने केलेला नाही.या उलट महेश भट्ट यांनी अमरकोषाच्या लिहिलेल्या टीकेत ‘एडुक ‘ या शब्दाचा अर्थ ज्या भिंतीला लाकडाचा उपयोग करून आधार दिलेला आहे अशी भिंत असा आहे.हा अर्थ लक्षात घेता ऐडूक म्हणजे मुस्लिमांचा इदगाह असावा असे मत कोसंबी यांनी मांडलेले आहे.इदगाहासमोर मुसलमान प्राथना (नमाज ) करतात.हा अर्थ जर बरोबर असेल तर महाभारताचा काही भाग मोहम्मद घोरी यांच्या आक्रमणानंतर लिहिलेला असावा असे सिद्ध होते.मुस्लिमांचे पहिले आक्रमण इब्ने कासिम यांच्या सैन्याने ई.स. ७१२ मद्ये केले.त्याने उत्तर भारतातील काही खेडे जिंकली ; पण त्याने फारशा विनाश केला नाही.त्याच्यानंतर महमंद गझनिने भारतावर स्वारी केली.गझनीच्या महम्मदने देवळे व विहार नष्ट केले व दोन्ही धर्माच्या पुरोहितांची कत्तल केली.परंतु त्याने इदगाह व मशिदी बांधल्या नाहीत.ते काम महम्मद घोरी याने केले.यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, ई. स. १२०० पर्यंत महाभारताचे लिखाण पूर्ण झाले नव्हते.

वेदांत सूत्रे

यापूर्वी सांगितल्या प्रमाणे वेद वाड:मयात वेद, ब्राम्हणे,आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश होतो. त्यांच्या विषयानुसार या साहित्याचे दोन प्रकार पडतात :
१) ज्या साहित्यात धार्मिक कार्ये,समारंभ,तांत्रिक विधी या सर्वांना कर्मकांड असे म्हणतात असे साहित्य.२) ईश्र्वर विषयक माहिती देणारे साहित्य आहे, त्यास ज्ञानकांड असे म्हटलेले आहे. वेद व ब्राम्हणे हे पहिल्या वर्गातील साहित्य आहे तर आरण्यके व उपनिषदे हे दुसऱ्या प्रकारात मोडतात.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹