February 6, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” सन -2021-22 योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना
11वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये.

1) ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे,ज्याने 2020-2021च्या 10वीच्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले असतील. विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेत प्रवेश घेऊ शकतो कला, विज्ञान,वाणिज्य अथवा इतर. 11 वी प्रवेश घेऊन शाळेच्या प्राचार्यांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक.

2) ही योजना दारिद्र रेषेखालील अथवा अडीच लाख रुपये वार्षीक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.

3) या योजनेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये असेल व नंतरचे 3 हप्त्यांसाठी 11वी व 12 वी च्या सहामाही व वार्षिक परीक्षेत 75% गुण असणे आवश्यक आहे.

4) या योजनेचा फॉर्म https://barti.in/notice-board.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा फॉर्म डाऊनलोड करून सर्व महत्त्वाची माहिती भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी २८, राणीचा,पुणे बाग ४११००१ , या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजने संदर्भात माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे

https://barti.in/upload/pdf/1627632145_yojna%2030.7.21.pdf