पोस्ट क्रमांक -३०
८. काळाच्या प्रवाहात गीतेच्या अनेक आवृत्यांची निर्मिती केली गेली याबद्दल विद्वानांत मतभेद नाहीत. आज ज्या स्वरूपात गीतेची रचना आहे. ती व मूल गीतेत बरेच भेद आहेत.याबद्दल सुद्धा विद्वानांत एकमत आहे.वेगवेगळ्या संपादकाच्या हातून त्यांच्या क्षमतेनुसार गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांची रचना निरनिराळ्या काळात करण्यात आली.खरे पाहता गीता ही प्रतिभावंत लेखकाने लिहिलेला अशाप्रकारचा कुठलाही ग्रंथ नाही केवळ काल्पनिक घटणाच यात ठिकठिकाणी दिसतात.यामध्ये अवडंबर पूर्ण व अर्थहीन शब्दांचा वापर करून एकच विचार पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
९. गीतेमध्ये अनेकदा साहित्यिक अलंकरण दोषपूर्ण आढळते.अनेक छंद उपनिषदापासुन जसेच्या तसे उचलून गीतेमध्ये घुसडून देण्यात आले आहेत.कवीने व लेखकाने टाळावयाच्या अनेक बाबी गीतेमध्ये सापडतात.केवळ पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी सत्य, रज व तमस यांचे वर्णन करण्यात आले आहे.
१०. निःसंशय गीतेची रचना खऱ्या व सर्जनात्तमक कवीची कृती नसून ती मुद्दाम रचण्यात आलेली कृती आहे.
११. वेगवेगळ्या लेखकांच्या हातून वेगवेगळ्या काळात गीतेच्या नवीन आवृत्यंची रचना करण्यात आली.याबद्दल विद्वाणामध्ये एकमत आहे.वादाचा मुख्य मुद्दा हा आहे की, मुळ गीतेमध्ये नवीन कोणता भाग जोडण्यात आला ? राजाराम शास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेत केवळ साठ श्लोक होते.
१२. हबोल्ड्स यांच्या विचारानुसार , मूळ गीतेमध्ये केवळ अकरा अध्याय होते. बारा ते अठरा अध्यायापरेंतची सामग्री नंतर जोडण्यात आली.
१३. हॉपकिन्स यांच्या म्हणण्यानुसार मुळ गीतेमध्ये प्रारंभिक चौदा अध्याय हेच होते.
१४. राजवाडे सुद्धा दहा व अकरा अध्याय गीतेमध्ये जोडण्यात आल्याबद्दल सहमत आहेत.
१५. प्रा .गर्वे यांच्या म्हणण्यानुसार मुळ गीतेमध्ये नसलेले १४६ छंद नवीन आहेत.यावरून हा अर्थ निघतो की, गीतेचा जवळपास पाचवा भाग नवीन जोडलेला आहे.
१६. गीतेच्या लेखकाबद्दल कुठेही उल्लेख सापडत नाही.गीतेचा उपदेश कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला आहे.या उपदेशाचे पूर्णकथन संजय याने कौरवांचा पिता धृतराष्ट्र यांच्यापुढे केलेले आहे.गीतेला आपण माहाभाराताचा एक भाग म्हणून स्वीकारू शकतो.परंतु गीता महाभारताचा भाग नसून स्वतंत्र अशी रचना आहे.लेखकांचा उल्लेख मात्र गीतेमध्ये सापडत नाही. तरीपण आपण हे अनुमान काढू शकतो की, * ‘ व्यास ‘* यानेच गीतेची रचना केली असावी.
क्रमशः.
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹

More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर