August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२८

ब्राम्हणवादी साहित्य

पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतर जे ब्राम्हणी साहित्य निर्माण झाले ते वस्तुस्थितीच्या कारणावर प्रकाश टाकते.
अशा ब्रमुनिन साहित्याला सहा भागात विभागलेले आहे.

१) मनुस्मृती
२) भगवतगिता
३) रामायण
४) माहाभारत
५) वेदान्त
६) पुराण

या साहित्याचे विवेचन करताना मी फक्त अशाच गोष्टीचा निर्देश करीन की ज्या बौद्ध धम्माच्या ऱ्हास ला कारणीभूत असल्याचे दिसून येईल.
* साहित्य हे जनतेच्या जीवनाचा आरसा असते असे मानले जाते. साहित्यात जनतेच्या जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते.*
एक मुद्दा स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते,हे साहित्य ज्यावेळी जन्माला आले त्याबाबतच्या निर्मितीकालाबद्दल आहे.पुष्यमिंत्राच्या प्रती क्रांती नंतरचे हे सर्व साहित्य जन्माला आले आहे.

याबाबतचे सर्वांचे मतैक्य होणार नाही. याउलट हिंदू लोक , ते सनातनी असोत वा नसोत, विद्वान असोत वा अल्पशिक्षित असोत, असे अगदी ठामपणे समजतात की आपले पवित्र साहित्य हे फार पुरातन काळातील आहे.त्यांचा हा विश्वास अपरिवर्तनीय आहे.किंबहुना तो त्यांच्या श्रध्देचाच भाग आहे. प्रत्येक हिंदूची यावर असीम श्रद्धा असते.आपले पवित्र साहित्य फार पुरातन आणि प्राचीन आहे.यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.

१) मनुस्मृती
मनूच्या काळाच्या संदर्भात मी मनुस्मृती ही सुमती भार्गव याने ख्रिस्तपूर्व १८५ मध्ये म्हणजे पुष्यमित्राच्या क्रांती नंतर लिहिली असल्याचे संदर्भ दिले आहेत .या विषयावर मी अधिक काही सांगण्याची गरज नाही.
२). भगवतगीता
भगवतगीतेच्या निर्मितीच्या काळा बाबत भिन्न मते आहेत.
१) श्री तेलंग यांच्या मते भगवत गीतेचा काळ हा ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापेक्षा प्राचीन असावा.अर्थात त्याआधी किती काळ हे ते सांगू शकले नाहीत.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹