February 5, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मदिप बुद्ध विहार अंबरनाथ येथे वर्षावास प्रारंभ

धम्मदिप बुद्ध विहार अंबरनाथ पू. येथे आषाढ पौर्णिमा निमित्ताने विहारात संपुर्ण बुद्ध वंदना घेतली. कार्यध्यक्ष कालिबाग यांनी प्रस्तावना केल्यानंतर भंते कश्यप यांनी पंचशीलाची कथा कथन केली. त्यानंतर अध्यक्ष सोनवणे यांनी आषाढ पौर्णिमा च्या दिवशी घडलेल्या चार घटना कथन केल्या. चोपडे गुरुजीनी थोडक्यात महत्व विशद केले. आयु.शितल दोंदे,कांचन काबळे, सुरेखा यांनी भंते यांना बुके पुष्पगुच्छ देवून आभार मानले.शेवटी सरणतय घेतले. शेवटी सोनवणे परिवारातर्फे खिरदान वाटप होवुन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला बहुसंख्येने उपासक,उपासिका सहपरिवार उपस्थित होता.