August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२७

 

त्यामध्ये पहिले नाव ‘ मिहिरकुल ‘ यांचे आहे.हा हुंण होता हुणानी भारतावर ४५५ मध्ये आक्रमण करून उत्तर भारतात आपले राज्य स्थापन केले.पंजाबात हुणानी साकल येथे (स्यालकोट ) आपली राजधानी बनविली .मिहिरकुलाने जवळपास ५२८ पर्यंत शासन केले.विन्सेंट स्मिथ म्हणतो की,

पूर्ण भारतीय इतिहासात मिहिरकुलाचे वर्णन क्रूर,आत्याच्यारी व रक्तपिपासू असे केले गेले आहे.सर्वसाधारण क्रूर आणि कठोर प्रमाणात असलेल्या आक्रमनक्रत्या पेक्षाही हुंण हे अधिक क्रूर हिंसक होते.शांततापूर्ण बौद्ध धम्माच्या विरूध्द मिहिरकुल याने शत्रूत्व अंगीकारले व बौद्ध स्तूप व विहराणा नष्ट करून तेथील संपती लुटून टाकली.

दुसरा राजा पूर्व भारतातील शशांक होता.त्याने सातव्या शतकाच्या प्रथम दशकात राज्य केले.शशांक हा हर्षवर्धन बरोबर झालेल्या लढाईत पराजित झाला.त्याच्याबाबत वीन्सेट स्मिथ म्हणतो,

” शशांक हा हर्षवर्धनाच्या भावाचा खुनी होता.हा संभवतः गुप्त वंशाचा शासक होता.हा शिवाचा उपासक असून बौद्ध धम्मा बद्दल घृणा बाळगीत असे.बौद्ध धम्माला नष्ट करण्याचा याने सर्वप्रकारचे प्रयत्न केले एका आख्यायिकेनुसार त्याने बुद्धगया येथील बोधिवृक्षाची मुळे खोदून काढली व त्यांना जाळून टाकले.या बोधिवृक्षावर अशोकाची फार श्रद्धा व भक्ती होती.शशांकने पाटलीपुत्र येथील बुद्धाचे पदचीन्ह असलेली शिलालेख देखील फोडून टाकली.भिक्षुकांचा छळ केला.त्यामुळे भिक्षू घाबरून इकडे तिकडे पळाले.भिक्षूचा पाठलाग याने नेपाळ पर्यंत केला.

सातवे शतक हे भारतात धर्मीक अत्याचार आणि छळांचे शतक म्हणून गणले गेले आहे.त्यामुळे बौद्ध धम्माचा नाश झाला.हा अत्याचार आणि छळ मुसलमानांच्या आक्रमणा पर्यंत अव्याहत सुरू राहिला.या गोष्टीचे अनुमान या तर्कावरून लावता येते की उत्तर भारतातील शाशक राजे लोक हे ब्राम्हण व राजपूत होते.हे दोघेही बौद्ध धम्माचे शत्रू होते.जैनांचा देखील असाच छळ १२ व्या शतकात ‘गुजरातचा शैव ‘ शासक अजयदेव याने केला याबाबतीत अनेक उदाहरणे इतिहासातील देता येतील.

अशाप्रकारे यामध्ये आता कुठलाही संशय राहत नाही की,बौद्ध धर्माच्या रह्यासला कारण बौद्धाद्वारे इस्लामचा स्वीकार करणे हे आहे.या मार्गाचा स्वीकार त्यांनी ब्राम्हणवादाच्या अत्याचार व छळापासुन बचावण्यासाठी केला.
 त्या वेळेला जर कोणते संकट असेल तर ते म्हणजे ब्राम्हणवाद हेच होय 

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹