नाशिक दि.२२ जुलै (प्रतिनिधी) बौद्ध धम्मामध्ये भिक्खू संघाच्या वर्षावास परंपरेला अतंत्य महत्व आहे.
तथागत भगवान बुद्ध यांच्या आदेशाने ही परंपरा सुरू झालेली आहे.ही .साधारत:आषाढ ते अश्विन ह्या तिन महिन्याच्या कालावधीत भिक्खू संघाचा वर्षावास असतो.वर्षाऋतूमध्ये धम्म प्रचार प्रसारासाठी भिक्खू संघाला मर्यादा येत असल्याने ते बुद्धविहारात,बुद्धलेणी किंवा ध्यानसाधना केंद्र याठिकाणी निवास करून धम्माचे अध्ययन करतात.सोबतच त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करतात.याच महान परंपरेचे पालन करून सन २०१८ साली पूज्य भन्ते ज्ञानज्योती(महाथेरो) यांनी त्रिरश्मी बुद्धलेणी या ठिकाणी वर्षावास केला.व ती परंपरा तिथून पुढे अविरत सुरु आहे.यावर्षी पूज्य भन्ते यु नागधम्मो (महास्थवीर) यांच्या अध्यक्षतेखाली पूज्य भन्ते अश्वजित (थेरो)औरंगाबाद यांना वर्षावास करण्यासाठी आमंत्रित केले आहे.त्यांच्या वर्षावासाला दिनांक २४ जुलै २०२१ प्रारंभ होणार असून त्याची समाप्ती २० ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्ती होईल.
पूज्य भन्ते अश्वजित (थेरो)यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्यामध्ये धम्मप्रचारासाठी जावून लहान मुलांवर धम्मसंस्कार रुजविण्यासाठी बालसंस्कार वर्ग घेतले आहे.सामान्य माणसाला त्यांच्या बोली भाषेत समजेल अश्या पद्धतीने भन्ते अश्वजीत धम्म समजावून सांगतात.तसेच भन्तेजी दै.सम्राटचे स्तंभलेखक असून ते अनेक वर्षापासून धम्मविषयावर प्रबोधन करण्यासाठी लेखन करीत आहे.
सध्यस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव यावर्षी वर्षावास कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविला जाणार आहे.प्रत्येक पौर्णिमा,अष्ट्मी,अमावस्या या उपोसथ दिवशी भिक्खू संघ उपासकांना सकाळी अष्टशील देवून धम्मदेसना देतील.त्याचप्रमाणे दैनंदिन समयसारणीनुसार दररोज सकाळी ठीक ५ ते ६ व दुपारी २.३० ते ३.३० सामुहिक ध्यानसाधना(केवळ जुन्या साधकांसाठी),सकाळी ९ ते १० बुद्ध वंदना पुजापाठ व सायंकाळी ठीक ७ ते ८ यावेळी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व विश्लेषण करण्यात येईल.सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भिक्खू वर्षावास उपासक उपासिका कमिटी व समस्त नाशिकमधील बौद्ध उपासक उपासिका संघाच्या वतीने करण्यात आले आहे.तरी आपण देखील वर्षावास निमित्ताने भिक्खू संघाची वेळोवेळी धम्मदेसना श्रवण करून सधम्माचा जिवनमार्ग जाणून घ्यावा.व भिक्खू संघाची संपूर्ण वर्षावास कालावधीत ( एकूण ९३ दिवस)भोजन,निवास,आरोग्य,दैनंदिन जिवनातील आवश्यक वस्तू,सकाळच्या नास्ता व सायंकाळच्या अल्पोहार आदी. वर्षावासातील आषाढ,श्रावण,भाद्रपद व आश्विन या चार पौर्णिमेला यथाशक्ती आर्थिक सहयोग देऊन दानपारमिता पूर्ण करून पुण्यअर्जित करावे ही विनंती.आपल्याला जर भिक्खू संघासाठी वस्तूदान ,आर्थिक रक्कमदान ,भोजनदान,चिवरदान,औषधदान,अल्पोहारदान किंवा अन्य स्वरूपात दान देण्याची इचछा असेल कृपया खालील क्रमकांवर अवश्य संपर्क साधा-९९६०३२००६३/८३२९६३८७२७/८२७५५८३५६२/९४०४१८५५७७/९१७५१५११११/
🌷🌷🌷🌷🌷
वरील कार्यक्रम ऑनलाइन स्वरुपात आपल्याला पाहण्यासाठी सर्वाना नम्र विनंती आहे. आपण त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास या फेसबुक पेज लिंकला लाईक करून जॉइन व्हावे.आपल्या सर्व दैनंदिन कार्यक्रम या पेजवरून लाइव्ह केले जाणार आहे.
👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/groups/2726855324255446/?ref=share
निमंत्रक-भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा