नाशिक : दिनांक 14 जुलै रोजी भन्ते अश्वजित(थेरो)भन्ते धम्मबोधी (थेरो),भन्ते धम्मदीप(थेरो)यांचे नाशिक शहरात आगमन झाले.समस्त नाशिककरांच्या वतीने भिक्खु संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी उपासक अनिल बागुल, उपासक सचिन गायकवाड,विष्णु कांबळे व बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे उपस्थित होते.भिक्खु संघाच्या स्वागतानंतर उपासक विष्णु कांबळे यांच्या धम्मपद या निवासस्थानी भोजन ग्रहण करण्यासाठी भिक्खु संघाचे आगमन झाले.कांबळे परिवारातील सदस्य यांनी मोठ्या श्रद्धेने भिक्खु संघाचे आदरातिथ्य करून भिक्खु संघाला भोजनदान देवून सत्कर्म केले.

More Stories
दलाई लामा ९१ वर्षांचे होत असताना, भारत आणि चीन बौद्ध धर्माच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत
थायलंडच्या अपघातात जखमी झालेल्या भिक्षूंच्या देखभाल त्यांना राजेशाही संरक्षणाखाली उपचार पुरवले जातील.
बोधिमग्गो महाविहार प्रवेश व्दार चे भूमि पूजन संपन्न