समस्त उपासक उपासिकांना सूचित करण्यात येते की, उद्या दिनांक 14 जुलै 2021 (बुधवार)रोजी दुपारी ठिक 2.30 ते 4.30 यावेळेत त्रिरश्मी बुध्दलेणीच्या परिसरात वर्षावास नियोजन संदर्भात मीटिंग आयोजित केली आहे.या मिटिंगमध्ये पुजनीय भिक्खु संघ उपस्थित राहून वर्षावास संबधित ज्येष्ठ उपासक उपासिकांना सविस्तर मार्गदर्शन करतील.
तरी भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटी सदस्य,सर्व बुध्दविहाराचे प्रतिनिधी,सामाजिक,धार्मिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी यांनी वेळेवर मीटिंग उपस्थित रहावे ही आग्रहाची नम्र विनंती.
मिटिंगचे मुद्दे-
1)भिक्खु संघाला वर्षावासासाठी याचना करून आमंत्रित करणे
2)वर्षावास समिति अंतर्गत विविध कार्यकारी समित्या नेमून जबाबदारी निश्चित करणे
3)90 दिवसाचा कार्यक्रम निर्धारित करणे व अंतिम रूपरेषा सादर करणे
4)कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घेणे बाबत चर्चा करणे
5)भिक्खु संघाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेबाबत
6)ऐनवेळी येणारे विषय यावर चर्चा करणे
निमंत्रक-भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटी आणि समस्त बौध्द उपासक उपासिका संघ नाशिक
संपर्क- 9960320063, 9987858595, 8275583562, 9423969037, 9175151111, 9225107644
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा