August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२१

ही सर्व राज्ये सनातनी ब्राम्हण धर्माची समर्थक होती. भारतावर मुस्लिम आक्रमणांना सन १००१ मध्ये सूरावात झाली.या आक्रमणाची झंझावाती लाट दक्षिणेत सन १२९६ पर्यंत संपूर्ण दक्षिण भारत मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली आला.३०० वर्षाच्या मुस्लिम आक्रमणाच्या या काळात संपूर्ण भारतावर हिंदू किंवा ब्राम्हणवादी राजांची सत्ता होती.या वाताहतीच्या काळात ब्राम्हणी धर्माला या हिंदू राजाचे समर्थन प्राप्त होते.परंतु मुडलिमद्वारे पराजित व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बौद्ध धम्माला मात्र कुणाचाही आश्रय प्राप्त होऊ शकला नाही अशा परिस्थितीत बौद्ध धम्म निराश्रित अवस्थेत होता.स्थानीय राज्यांची हेटाळणी व आश्रयविना बौद्ध धम्म भारतात मृतप्राय झाला व मुस्लिम आक्रमकांच्या ज्वालात जळून नष्ट झाला.

मुस्लिम आक्रमणकारी लोकांनी ज्या बौद्ध विश्वविद्यालयाना लुटून नष्ट केले त्यामध्ये नालंदा, विक्रमशिला, जगदल, ओदांतपुरी ही विश्ववीध्यालये होती.देशातील या सर्व बुद्धविहाराना मुस्लिम आक्रमकानी नष्ट केले.जीव वाचवण्या करिता हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षू भारता बाहेर नेपाळ, तिबेट, व इतर देशात पळून गेले.मुस्लिम आक्रमकांनी हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षूची कत्तल केली.

या बौद्ध भिक्षुची किती निर्घृणपणे मुस्लिम आक्रमका‌द्वारे हत्या करण्यात आली, याचे वर्णन स्वतः मुस्लिम इतिहासकारांनी केलेले आहे.

१९१७ मध्ये मुस्लिम सेनापतीने आक्रमणाच्या वेळी बिहारमध्ये कोणत्या व कशा प्रकारे हत्या केली गेली यांचे वर्णन विन्सेट स्मिथ यांनी केले आहे.

” त्यांच्या मते, आक्रमणाकरीता प्रसिध्द असलेल्या ज्या मुसलमान सेनापतीचे नाव प्रसिद्ध होते.त्याने एका झटक्यात येथील राजधानीवर ताबा मिळविला.त्याच वेळेला आक्रमण कर्त्या दलातील एकाशी इतिहासकारांची भेट झाली.त्या माणसा द्वारे इतिहासकाराला माहित हे माहीत झाले की,केवळ २०० घोडेस्वारानी विहारातील एका किल्ल्यावर (विहारावर ) बेधडक बिनविरोध मागील दारातून आक्रमण केले व तो संपूर्ण किल्लाच जिंकून घेतला.लुटीत याना प्रंचंड प्रमाणात संपती प्राप्त झाली.आक्रमणं कर्त्यानी मुंडण केलेल्या ब्राम्हणाची अर्थात बौद्ध भिक्षूची इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या केली की,त्या संपूर्ण विहारतील पुस्तक वाचण्या करिता एक भिक्षू देखील आक्रमण कर्त्याना उपलब्ध होऊ शकला नाही.नंतर आम्हाला कळले की,हे संपूर्ण विहार एक मोठे विश्व विद्यालय होते हिंदी भाषेत माहाविध्यालयाला “विहार” म्हणतात.”
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती