कोरोना च्या संकटा मधे थाईलैंड चे पूजनीय भंते अजाहन जयासारो आणि त्यांचे थाई बौद्ध धम्म उपासकांनी, IAS Dr. Harshadeep Kamble आणि रोजाना कांबळे यांच्या सहकार्याने भारता मधे 31 रुग्णवाहिका चे दान दिले आहे आज पुण्यामधे टाटा मोटर्स या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मधे लोकार्पण करण्यात आले या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट जनरल श्री सिरिकुल हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते
भगवान बुद्ध उपदेश देतांना सांगतात जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो अर्थात हे जग एकमेकांवर निर्भर आहे. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात,ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे
भारतामधे जेव्हा कोरोना ची दूसरी लाट उंचीवर होती तेव्हा दुःख, वेदना आणि चिंतेने ग्रस्त भारतीयांसाठी थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी मदती चा हाथ दिला
संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप दोन्ही देशांचा दुवा ठरला
मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड मधील थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशन चे परमपूजनीय भंते अजान जयासारो यांच्या आव्हाना नुसार थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार 31 Ambulance ची बहुमोल अशी मदत केली आहे
महाराष्ट्रा चे Industry Commissioner हर्षदीप कांबळे यांच्या माध्यमातून ही सर्व मेडिकल सहायता भारताला प्राप्त झाली, त्यापैकी Oxygen Concentrator आणि Ventilator चे यापूर्वी वितरण झालेले आहे तर 31 Ambulance चा लोकार्पण समारोह आज पुण्या मधे पार पडला
बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लद्दाख़ या बौद्ध स्थला सह नागपुर,औरंगाबाद, बंगलोर, दिल्ली सह भारता मधील 31 ज़िल्हया मधे या Ambulance चे दान दिले जाईल
या दाम्पत्याचे मनापासून स्वागत आणि मंगलकामना आणि पूजनीय भंते अजान जयासारो ज्यांच्या निर्देशाने हे सर्व शक्य झाले त्यांचे आणि Thailand च्या बौद्ध उपासकांचे समस्त भारतीय जनते च्या वतीने आभार आणि साधुवाद |
भवतु सब्ब मंगलम |
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?