August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१९

१) पहिली गोष्ट ही की मुस्लिम आक्रमणाच्या वेळी ब्राम्हणवादाला राजाश्रय प्राप्त होता.बौद्ध धम्मला मात्र राजाश्रय प्राप्त नव्हता . परंतु सर्वाधिक महत्वपूर्ण गोष्ट ही की,बौद्ध धम्म पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ब्राम्हणवादाला भारतात राजाश्रय प्राप्त होता.
२) दुसरी गोष्ट ही की इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूचे पूर्णपणे शिरकाण केले व बौद्ध भिक्षू परंपरेला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही.याउलट ब्राम्हणवादी पौरोहित्यला कायमचे नष्ट करणे मुस्लिमाना शक्य झाले नाही.

३)तिसरी गोष्ट ही की,भारतातील ब्राम्हणवादी शासकांनी बौद्ध बहुसंख्य जनतेवर अत्याचार केले.त्यांच्या या अत्याचार व छळापासुन बचाव करण्याकरिता भारतातील बहुसंख्यांक बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी बौद्ध धम्माला कायमचे सोडून दिले.

वरील तीनही बाबींचे इतिहास समर्थन करतो.मुस्लिम प्रभावाखाली येणारा भारतातील सर्वात प्रथम प्रांत सिंध होता.पूर्वी या प्रांतावर शूद्र राजा राज्य करीत होता.परंतु एका ब्राम्हणाने हे राज्य बळकावले.या वंशांचे शासन सिंधिवर ७१२ पर्यंत चालले. इसवी सन ७१२ मध्ये ईब्न कशिमद्वारा सिंधवर आक्रमण झाले.तेव्हा एक ब्राम्हण शासाकाद्वारे ब्राम्हण धर्माला वाचविणे स्वाभाविक होते.सिंध चां शासक दाहिर होता. दाहीर हा ब्राम्हण वंशाचा होता.

स्वतः हूएनत्सगंने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते की, त्याच्या वेळी पंजाब मध्ये बौद्ध वंशांच्या राजाचे शासन होते.या वंशाने पंजाबवर ८८० पर्यंत शासन केले.नंतर हे राज्य ‘ लाल्लिय ‘ नावाच्या ब्राम्हणाने बळकावले व त्याने ब्राम्हणवादी धर्माला राजाश्रय दिला. या वंशाने पंजाबवर ८८० ते १०२१ पर्यंत शासन केले.यावरून हे दिसून येते की,ज्यावेळी सुबुक्तगीन आणि मोहम्मद कासिमने पंजाबवर आक्रमण केले, यावेळी भारतातील बहुतेक शासक ब्राम्हण धर्मावलंबी होते.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती