November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध जयंतीनिमित्त विशेष लेख – अनिल वैद्य

१४ ,ऑक्टोबर १९५६ ला डॉ बाबासाहेआंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन ६५ वर्ष झाले. मार्गदर्शना साठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दिला .दीक्षे नंतर धम्मा विषयी अनभिज्ञ असलेला समुह धम्म ज्ञान मिळवू लागला. बऱ्यापैकी प्रगती झाली आहे परन्तु ६५ वर्षा नंतरही याच ग्रँथातील महत्वाचे उपदेश अद्यापही दुर्लक्षित आहेत.
हे उपदेश जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते समजून घेणे व उपदेशाचे निष्ठेने पालन करणे आपले कर्त्यव्य आहे.
उदाहरणार्थ
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “चार स्मृती उपस्थानाचा उदभव होईल असे वागले पाहिजे
हा भ बुद्धाने लावलेला वैद्न्यानिक शोध आहे. ज्या मुळे भ बुद्धाला जगात आगळे वेगळे स्थान आहे. स्मृती ची प्रतिष्ठापना करणे हे महान वैद्न्यानिक तंत्रज्ञान आहे. हा उपदेश सुत्तपिटकाच्या दिघ निकाय मध्ये आहे .
भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म म्हणजे काय (ग)”या प्रकरणात खालील प्रमाणे
चार स्मृतिप्रस्थाना बाबत लिहले आहे
पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत. साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या ?
जीवहिसा, चोरी, काममिमिथ्याचार. असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन. ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत.
साधनेतील या पाच बाधा दूर केल्यापर *चार प्रकारच्या सावधानतेवा (स्मृती-उपस्थानाना) मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे*.
पहिल्या सावधानतेत भिक्कू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि संतोष यावर विजय मिळवुन, प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने, कायेला.ती केवळ काया असे मानुन  (कायानूपश्यना करीत)  जीवन व्यतीत करतो,
* वेदनांना (Feelings) या केवळ वेदना आहेत असे मानून (वेदनानु पश्यना करीत) जीवन व्यतीत करतो..
* चित्त, हे चित्त आहे असे मानुन ( चित्तानुश्पना करीत ) जीवन व्यतीत करतो.
* चितात उत्पन्न होणारे विचार (धर्म) ते केवळ चित्तधर्म आहेत, असे मानून
 (धम्मनुपश्यना करीत )  प्रयत्नपूर्वक, जागरूकतेने आणि स्वाधिंनचित्ताने सर्व सामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो
जेव्हा साधनेतील पाच बाधा दूर होतात तेव्हा चार सावधानताचा
( स्मृति-उपस्थानाचा ) उदय होतो.”
(संदर्भ :-भ बुद्ध आणि त्यांचा धम्म :प्रकरण :-धम्म म्हणजे काय(ग)पृष्ठ १७७)
आणापानसती व चार स्मृती उपस्थानाचा सराव कसा करायचा या बाबतचा उपदेश भ बुद्धाने सतीपाठठान सुत्तात केला आहे. ,(पहा :-दिघ निकाय :-अनुवादक प्रो डॉ विमल कीर्ती ,समता प्रकाशन ,नागपूर पृष्ठ 377)
भ. बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथात जे लिहिले ते समजून घेणे व त्याचे निष्ठेने पालन करणे गरजेचे आहे.
या प्रकरणात खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चार स्मृती उपस्थानाचा उदभव होईल असे वागण्याचा उपदेश केला .विशेष म्हणून हा उपदेश ज्या प्रकरणात आहे त्या प्रकरणाचे नाव सुद्धा लक्षात घ्यावे लागते ,ज्या प्रकरणाचे नाव ‘धम्म म्हणजे काय ?’आहे त्या प्रकरणात डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, चार स्मृतिउपस्थानाचा उदभव होईल असे वागले पाहिजे.या वरून बौद्ध उपसकांनी या उपदेशाचे महत्व जाणून घ्यावे.
भ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रँथ जीवनात उतरविण्यासाठी प्रत्येक उपदेश समजून घेणे व तो अंगीकृत करणे गरजेचे आहे.प्रकरणात आलेले पालीभाषेतील त्रिपटकाचे शब्द व वाक्य जरूर अवघड वाटतात पण ते न समजल्यास जाणकार व अभ्यासू व्यक्ती कडून समजून घेणे गरजेचे आहे.
या उपदेशाचे आज बुद्ध जयंती निमित्ताने पालन करू अशी अपेक्षा ! बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा,!
अनिल वैद्य