आपण समस्त नाशिककर खरच खुपच पुण्यवान आहोत.पुण्यवान या अर्थाने महान कुशल कर्म करणारे.जगप्रसिद्ध ऐतिहासिक प्राचीन त्रिरश्मी बुध्दलेणी असलेल्या शहरात आपल्या सर्वांचे वास्तव्य आहे ही बाब प्रत्येकांच्या मनाला कायम सुख देणारी आहे.नाशिक हे पूर्वीपासूनच धम्मचळवळीचे जागतिक दर्जाचे एक मोठे प्राचीन शहर होते हेच त्रिरश्मी बुध्दलेणीवरुन अधोरेखित होते.त्रिरश्मी बुध्दलेणीच्या अभ्यासातून गत्कालीन बौद्ध राज्यकर्ते यांचा गौरवशाली इतिहास, शासनव्यवस्था, प्रशासनव्यवस्था, संस्कृति, सर्व साधारण लोकांचे जीवनमान, बुध्द, धम्म व संघ या त्रिरत्नाप्रती असलेली नितांत श्रद्धा प्रकट होते.आपल्या सर्वश्रेष्ठ बौध्द धम्माच्या महान धम्मसंस्कृतिचा वारसा हजारो वर्षापासून टिकवून ठेवून ही लेणी बौद्ध संस्कृतिचे प्रतिक म्हणून आजही दिमाखात भक्कमपणे उभी आहे.अश्या या लेणीच्या सहवासात एकटेच किंवा परिवरातील सदस्यासह जायला,फिरायला,काहीवेळ व्यथित करायला सर्वानाच आवडते.कितीतरी वेळा आपण लेणीला भेट दिली असली तरीसुद्धा प्रत्येक वेळेला या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा जायला आवडते.त्याचे कारण धम्म तरंगाने पुलकित झालेला व नयनरम्य निसर्गाच्या हिरवली नटलेला परिसर. लेणीला भेट दिल्यावर लेणीमधील विविध भावमुद्रेतील आकर्षक बुध्दरूप प्रतिमा,चैत्य,स्तूप, विहारातिल ध्यानसाधनाकक्ष आदी.पाहूनच मन मोहित होते.हे सर्व लेणीच रूप ईवल्याश्या डोळ्यात पुन्हा पुन्हा साठवून ठेवण्याची इच्छा होत असते.अशी ही बुध्दलेणी आपल्या सर्वामध्ये धम्माप्रती निस्सीम,निर्मळ व निरंतर श्रद्धाबळ वाढविणारे ऊर्जाकेंद्र आहे. या लेणीमधून भूतकाळात कित्येक हजारो तपस्वी,ज्ञानी,प्रज्ञावान, विनयशील,भिक्खू व भिक्खुनी साधना करून दुःख मुक्तीचा मार्ग अनुसरला आहे. तसेच अगणित भिक्खूनी अर्हंत, सकदागामी,श्रोतापन्न फलप्राप्ती करून घेतली आहे.अश्या भिक्खू भिक्खूनी संघाला भोजनदान,चिवरदान, औषधदान,आर्थिकदान देवून त्यांना निर्वाणाच्या मार्गावर जाण्याकरीता सहायक ठरणारे पुण्यकर्म करणारे श्रद्धावान उपासक उपासिका देखील तितकेच महान हेच यावरून दिसून येते.म्हणूनच अश्या या लेणीचे धम्मातील विशेष महत्त्व लक्षात घेवून वर्तमानातील भिक्खू संघाने देखील प्राचीन काळातील भिक्खू संघाच्या धम्मकार्याचा आदर्श समोर ठेवून समस्त नाशिकच्या उपासक उपासिकांवर अनुकंपा करून धम्मदान(धम्मदेसना)देवून लाभान्वित करावे.सध्याच्या वर्तमानातील आपण समस्त उपासक व उपासिकांनी गतकाळातील महान उपासक व उपासिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या वर्षावासात आषाढ ते आश्विन पौर्णिमेपर्यंत
1)भिक्खू संघाची सेवा करूया पुण्य अर्जित करूया
2)शीलपालन करून पुण्य अर्जित करूया
3) दानकर्म करून पुण्य अर्जित करूया
4)धम्मदेसना श्रवण करून पुण्य अर्जित करूया
5) धम्म आचरण करून पुण्य अर्जित करूया
चला तर नाशिकच्या समस्त धम्म बंधु व भगिनींनो वर्षावास निमित्ताने आपण सारे मिळून सामुहिक सम्यक संकल्प करून हे हाती घेतलेले यावर्षी 2021 मध्ये त्रिरश्मी बुध्दलेणीवर निवासी राहून तिन महीने वर्षावास करणारे पुजनीय भन्ते अश्वजित (औरंगाबाद) यांच्या वर्षावास कार्यक्रम नियोजनाचे हे असाधारण कुशल कार्य सर्वांच्या सहकार्य भावनेने त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास कार्यक्रम नियोजन समिती व समस्त उपासक उपासिका संघाच्या सहकार्याने पूर्णत्वास घेवून जावूया 💐💐💐💐💐💐
शेवटी,आपल्या सर्वांच्या प्रती असीम मंगल मैत्री व्यक्त करतो.
आयु. मिलिंद बनसोडे ( बौद्धाचार्य )
( त्रिरश्मी बुद्धलेणी वर्षावास कार्यक्रम समिती समन्वयक )
संपर्क-9960320063
More Stories
Buddhist Meditation : बौद्ध ध्यानासाठी संपूर्ण मार्गदर्शक: तत्त्वे, तंत्रे आणि फायदे
बौद्ध समाजात भावकी पाहिजे – आद. आयु सयाजी वाघमारे
सम्राट अशोकांच्या लिपिला “धम्मलिपि” च्या ऐवजी “ब्राह्मी” चा अट्टाहास धरणाऱ्यांना OPEN CHALLENGE’ – अतुल भोसेकर