August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक. -१५

या सर्वामध्ये महत्त्वाचा सिद्धांत हा अहिंसेचा होता.केवळ जीव वाचविण्यासाठी या सिद्धांतांचा उपोयोग करायचा नाही असे नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक सजीवा प्रती मानवाने सवेंदनशील सदभावनापूर्वक आणि मैत्री पूर्वक राहावयास पाहिजे.

बुध्दाने इतर सिद्धांताना देखील असाच व्यापक आणि सकारात्मक दृष्टीकोन प्रदान केला.
सुखी आणि संपन्न जीवना करिता दृढ संकल्प करून आणि सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.बुद्धाचे उपदेश हे केवळ नकारात्मक नव्हते तर ते सकारात्मक आणि रचनात्मक ही होते.बुद्धाच्या सिद्धांताचे अनुसरण करणाऱ्यावर बुध्द संतुष्ट नव्हते तर त्या व्यक्तीने इतरांना देखील प्रवृत्त करावे असा बुद्धाचा आग्रह होता.
अगुंतर निकाया मध्ये बुध्दाने एक चांगला मनुष्य आणि श्रेष्ठ मनुष्य यामध्ये भेद केलेला आहे.जो मनुष्य हत्या, चोरी, खोटे बोलणे आणि मादक पदार्थाचे सेवन करीत नाही त्याला चांगला मनुष्य म्हणावा ; परंतु श्रेष्ठ मनुष्य त्यालाच म्हणावे जो वरील नियमांचे पालन स्वतः करतो आणि इतरांना पालन करावयास लावतो.

म्हणून म्हणतात की बौद्ध धम्माची दोन वैशिष्ट्ये आहेत : एक म्हणजे मैत्री आणि दुसरा विवेक हा होय.
मैत्रीपूर्ण व्यवहाराला जीवनात अत्यंत आवश्यकता आहे.हे बुध्दाला पूर्णपणे माहित होते.म्हणून बुध्द म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाची आई आपल्या बाळाची काळजी करते,त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र बड्डल मनुष्याने व्यवहार केला पाहिजे.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती

🌹🙏🏻🌹