📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🔷 ५. महामायेचा मृत्यू 🔷
१. बालकाच्या जन्माच्या ५ व्या दिवशी नामकरण संस्कार विधी करण्यात आला. बालकासाठी
सिद्धार्थ हे नाव निवडले गेले. बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकात तो सिद्धार्थ गौतम म्हणून प्रसिद्धी पावला.
२. जन्म आणि नामकरणाचा आनंदी, उल्हासित सोहळा उपभोगित असतानाच महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले.
३. आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली. तिने शुद्धोदन आणि प्रजापती यांना आपल्या शय्येजवळ बोलावून घेतले. ती म्हणाली, ‘असितमुनींनी माझ्या पुत्राविषयी जी भविष्यवाणी केली आहे ती सत्य होणार यात मला शंका नाही. माझे दुःख हे आहे की, ती भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही.’
४. ‘माझा पुत्र लवकरच मातृत्विहीन होणार परंतु माझ्यानंतर त्याचे संगोपन, त्याचे पालनपोषण आणि त्याचे भवितव्य याविषयी मी तिळमात्रही चिंतित नाही.’
५. ‘हे प्रजापती, मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे. मला विश्वास आहे तू त्याच्यासाठी आईपेक्षाहो श्रेष्ठ ठरशील’.
६. आता दुःख करू नका मला मृत्यूला सामोरे जाण्याची अनुज्ञा द्या मृत्यूदूतांचे आमंत्रण आले आहे. ते प्रतीक्षारत आहेत’ एवढे बोलून महामायेने अंतिम श्वास सोडला. शुद्धोदन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले. दुःखातिशयाने ते धाय मोकलून रडू लागले.
७. जेव्हा त्याच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त सात दिवसाचा होता.
८. सिद्धार्थाला नंद नावाचा एक लहान भाऊ होता. नंद हा शुद्धोदन आणि महाप्रजापती यांचा पुत्र.
९. सिद्धार्थाला अनेक चुलतभाऊ, आतेभाऊ होते. महानाम आणि अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन यांचे पुत्र. तर आनंद हा त्याचा चुलता अमितोदन यांचा पुत्र देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धाथपिक्षा वयाने मोठा होता. आनंद वयाने लहान होता.
१०. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार