November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग दुसरा – ४. गौतमाचे उत्तर ( उत्तरार्ध )

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग दुसरा  – कायमचा गृहत्याग.

🌼 ४. गौतमाचे उत्तर ( उत्तरार्ध ) 🌼

१. “मी जगातील कलहांनी आहत (घायाळ) आहे. मी परम शांतीच्या शोधात बाहेर पडलो आहे. या पृथ्वीतलावरील दुःखाचा अंत करण्याच्या मोबदल्यात दिव्य लोकाचे साम्राज्यही मी स्वीकारणार नाही. मग या पृथ्वीतलावरील राज्याचे मला काय मोल ?

२. “परंतु हे राजा, तीन पुरुषार्थाची प्राप्ती हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे असे आपले म्हणणे आहे. आपण असेही म्हणाला की, माझा मार्ग हा दुःखाचा मार्ग आहे. परंतु आपण कथन केलेले तीनही पुरुषार्थ अनित्य, असंतोषकारक आहेत. ३. “आपण असे बोलता की, यौवनाचा काही भरवसा नाही. वार्धक्यापर्यंत वाट पाहावी. परंतु ही

अनिर्णयाची अनिश्चित अवस्था आहे. कारण यौवनात दृढता असू शकते आणि वार्धक्यही

संकल्पहीन असू शकते. ४. “नियती एवढी कुशल आहे की, ती प्राणिमात्राला वयाच्या कोणत्याही वळणावर मृत्यूच्या खाईत लोटू शकते. म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसताना सुज्ञ माणूस परम शांतीच्या शोधासाठी वार्धक्यापर्यंत वाट पाहणार नाही.

५. “जिवंत प्राणिमात्रांची मृगया करण्यासाो कुशल शिकाऱ्यासारखा मृत्यू तत्पर असताना, वार्धक्य त्याचे शस्त्र असताना, रोग त्याचे बाण अस्ताना, प्राणिमात्र मृत्यूकडे असे झेपावतात जसे

मृग वनाकडे. अशा स्थितीत दीर्घायुष्याची कामना कोण करील ? ६. “युवा, वयस्क, वृद्ध किंवा बालक, सर्वांना हेच योग्य आहे की त्यांनी करुणेच्या धर्मपथावर अग्रेसर व्हावे.

७. “आपण बोलला की, मी माझ्या कुळाचारानुसार यज्ञ करावे, आहुती द्याव्या आणि महान फल्. ची अपेक्षा करावी. अशा यज्ञ आहुतींना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन प्राप्त होणाऱ्या

फलाची मला अपेक्षा नाही. ८. “जरी अशा आहुतींनी दिव्य फलप्राप्ती होणार असली तरीही. अशा फलांच्या अपेक्षेने असहाय्यांचा बळी देणे हे सहृदय कारुणिकासाठी अवांछनीय कर्म होय.

९. “आत्मसंयम, सदाचार आणि कामजित होणे म्हणजेच सद्धर्म. पण हे आपणास मान्य नसेल तरीही, जेथे बळी देऊनच श्रेष्ठतम फलाची अपेक्षा केली जाते अशा यज्ञ आहुतींच्या नियमांचे पालन करणे मला उचित वाटत नाही.

१०. “दुसन्याला आहत करून याच जन्मी सुख समाधान प्राप्त होणार असेल तर सुज्ञ कारुणिकाने याचा धिक्कारच करावा अदृश्याच्या प्राप्तीसाठी असे कर्म तर सर्वथा निंदनीय आहे.

११. “पुढील जन्मात फळ मिळेल या आशेने मी कोणतेही कर्म करण्यास प्रवृत्त होणार नाही. पावसाच्या माऱ्याने चहुबाजूंनी पीडित वृक्षवल्लीसम ज्या कर्माची दिशा अनिश्चित आणि अस्थिर आहे असे कोणतेही कर्म मी करणार नाही. हे राजा, मला पुढील जन्माची कल्पनाच सुखकारक वाटत नाही.”

१२. आपले दोन्ही हात जोडून राजा उत्तरला, “आपले जीवितकार्य कोणत्याही अडचणीशिवाय

पूर्ण होवो. आपणास आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त झाले तर कृपया माझ्यावर अनुग्रह करावा, अशी माझी अपेक्षा आहे.”

१३. गौतमाकडून पुनर्भेटीचे दृढ वचन घेऊन राजा आपल्या सेवकांसह आपल्या राजप्रासादी परतला.