August 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – ३.बुद्धाचा जन्म

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

 प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🔷 ३. बुद्धाचा जन्म 🔷

१. शुद्धोदनाघरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याची जन्मकथा अशी आहे.

२. मीष्मऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती.राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत. त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यहीह्या उत्सवात भाग घेत.
३. साधारणपणे हा वर्षोत्सव सात दिवसपर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती.

४. एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद-प्रमोदाने साजराकरण्याचे ठरविले. परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती.
५. सातव्या दिवशी ती प्रात:काळी जागी झाली. तिने सुगंधी जलाने स्नान केले. तिने चार लाखकार्षापण (मुद्रा) दान केल्या. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले. तिने स्वेच्छेनेसर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील दर सुशोभितशयनमंदिरी शयनासाठी गेली.

६. त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा सहवास घडला. महामायेला गर्भधारणा झाली. राजशय्येवर तिला गाढ निद्रा आली. तिला निद्रेत एक स्वप्न पडले.
७. स्वप्नात तिला असे दिसले की, चार लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले; आणि ते सर्व एकाबाजूला उभे राहिले.
८. त्यानंतर त्या चार लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानससरोवराकडे नेले.
९. त्यांनी तिला न्हाऊ घातले. तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिली. तिला सुगंधी द्रव्ये माखली. तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले. जणू महामाया एखाद्या दिव्यात्म्याच्या स्वागतासाठीसज्ज झाली.
१०. त्यानतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामार्यपुढे उपस्थित झाला. आणि म्हणाला, “यापृथ्वीतलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय, तू माझी माता होशील ?” ती म्हणाली, “होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. ” या क्षणी महामाया जागी झाली.
११. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी महामायेने शुद्धोदनाला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचाअर्थ कसा लावावा हे शुद्धोदनाला समजले नाही म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा आठब्राह्मणांना आमंत्रित केले.
१२. हे आठ ब्राह्मण म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यन्न, सुयम, सुभोग, आणि सुदत्त हे होत. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य ती तयारी केली.

१३. त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गली. त्यांच्यासाठी उच्चासनेमांडली गेली.
१४. शुद्धोदनाने त्या ब्राह्मणांची दानपात्रे सोन्या-चांदींनी भरली. तूप, मधु, शर्करामिश्रित दुधातशिजविलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले. शुद्धोदनाने त्यांना वस्त्रप्रावरणे आणि ताम्रवण गायी दान दिल्या.कथन करण्याची विनंती केली.

१५. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोदनाने महामायेये स्वप्न त्यांना सांगितन व त्याचा अर्थ

१६. ब्राह्मण म्हणाले, “चिता करू नये. तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल, त्याने गृहस्थ जीवन स्वीकारलेतर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग करून संन्यास्याचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तोबुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंध कारातून मुक्त करणारा बुद्ध होईल.”
१७. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमनाणे महामायेने बोधिसत्वाला १० महिनेआपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसवकाळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठीआपल्या माहेरी माता-पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, “मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते. ”
१८. “तुला माहीत आहे की, तुझी इच्छा मला प्रमाण आहे, शुद्धोदन उत्तरला. तिला सुवर्णाच्यापालखीत बसवून वाहक, सेवक व मोठा लवाजमा देऊन त्याने तिची पितृगृही रवानगी केली.
१९. महामायेच्या देवदहच्या वाटेवर शालवृक्षाचे एक सुदर वनाधान होते. या वनोद्यानात विविधप्रकारच्या पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होत्या. हे वन लुम्बिनी वन म्हणून प्रमिन्ट होते.
२०. जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागला तसे लुम्बिनी वन है दिव्य अशाचित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकनशामियान्यासारखे भासू लागले.
२१. वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच्च बहरली होती. असंख्य
विविधरंगी मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते.
२२. हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात धोडावेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शालवनात उतरविण्यास सांगितली व वाट पाहण्याची आज्ञाकेली.
२३. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शालवृक्षाकडे गेली. मंद मंद सुगंधित वारावाहत होता आणि वृक्षाच्या शाखा वर खाली झुलत होत्या. महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एकशाखा पकडण्याची इच्छा झाली.

२४. भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली.
महा येने टाचा उंचावून ती शाखा धरली. त्वरित शाखेने वर झोका घेतला. त्याबरोबरच महामाया हीएकाएकी वर उचलली गेली. या आघाताने महामायेला प्रसव वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाचाशाखा हाती असतानाच महामायेने उभ्याउभ्याच पुत्राला जन्म दिला.

२५. पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला.

२६. शुद्धोदन आणि महामायेचा विवाह होऊन बरीच वर्षे लोटली होती परंतु त्यांना संतान नव्हत.
जेव्हा त्यांना पुत्ररल प्राप्त झाले तेव्हा शुद्धोदन, त्याचे कुटुंब आणि समस्त शाक्यांनी पुत्रजन्माची हसोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला.
२७. पुत्रजन्मसमयी कपिलवस्तूवर राज्य करण्याची शुद्धोदनाची पाळी होती म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधिले जात असे. स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधिले जाऊ लागले.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म