April 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग तिसरा – २. सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन.

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग तिसरा – नव प्रकाशाच्या शोधात.

🌼 २. सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन.🌼

१. भृगू ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालामच्या आश्रमाच्या शोधात निघाला.

२. आलार कालाम वैशाली येथे वास्तव्याला होता गौतम तेथे गेला वैशालीला पोहोचल्यावर त्याच्या आश्रमात गेला.

३. आलार कालामजवळ जाऊन तो म्हणाला “मी तुमचे तत्वज्ञान आणि विद्याशाखेत दीक्षित होऊ इच्छितो.”

४. यावर आलार कालाम म्हणाला, “तुझे स्वागत असो. तुझ्यासारख्या बुद्धिवंताला माझे तत्वज्ञान अध्ययन करण्यास, आत्मसात करण्यास आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास फारसा वेळ लागणार नाही.

५. “श्रेष्ठतम शिक्षा प्राप्त करण्याची निश्चितच तुझी पात्रता आहे.”

६. आलार कालामचे हे वचन ऐकून राजपुत्र आनंदित झाला आणि उत्तरला ;

७. “माझ्याप्रति जी असीम करुणा तुम्ही व्यक्त केली त्यामुळे अपूर्ण असूनही पूर्णत्वास प्राप्त झालो असे मला वाटते.

८. “कृपा करून आपले तत्वज्ञान मला सांगावे.”

९. आलार उत्तरला, “तुझे शील, तुझे चारित्र्य आणि तुझा संकल्प यांचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की, तुझी योग्यता जाणून घेण्यासाठी मी तुझी कोणतीही पूर्व परीक्षा घेऊ इच्छित नाही”

१०. “हे श्रेष्ठ साधका, माझा सिद्धांत सावधान चित्ताने महण करावा.”

११. नंतर त्याने गौतमाला आपला सिद्धांत समजवून सांगितला त्याकाळी तो सिद्धांत सांख्य दर्शन म्हणून प्रचलित होता.

१२. आपल्या संभाषणाच्या शेवटी आलार कालाम म्हणाला,

१३. “हे गौतमा, मी तुला जे संक्षिप्त रूपाने सांगितले तेच माझ्या तत्वज्ञानाचे सिद्धांत आहेत”

१४. आलार कालामने त्याच्या तत्वज्ञानाच्या केलेल्या स्पष्ट विवेचनाने गौतम प्रसन्नता पावला.

२. सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन ( समाप्त )….