वसमत येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी बौध्द धम्म परिषद संपन्न झाली. बसमध्ये पार पडलेल्या १८ व्या धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रा.एम. सत्यपाल महाथेरो, हे होते तर उद्घघाटक म्हणून भदंत डॉ. एस. आर. इंदवंश महाथेरो हे होते धम्म परिषद झाली मोठ्या संख्येने समाज बांधव महिला यांची उपस्थिती होती मान्यवरांनी येथे मार्गदर्शन केले.
धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सामुहिक मंगल परिणय कार्यक्रम घेण्यात आला
धम्म परिषदेच्या निमित्ताने माळवाटा येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पुज्य भिक्कू यांची धम्मदेशना संपन्न झाली. सुप्रसिद्ध गायिका मयुरी खाडे यांचा बुध्द भिम गितांचा कार्यक्रम आयोजिकरण्यात आला होता.
कार्यक्रमाला आ. राजुभैया नवघरे हजेरी लावली यावेळी आमदार नवघरे यांनी उपस्थित समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार एंगडे, डॉ. कुंटे, विजयकुमार एंगडे, भास्कर गवळी, पारखे, बंडू सोनुले, भाऊ मुळे, खंडू भवरे, लखन गवळी, निलेश खंदारे, शुभम घोडके, शाम मुमरे, लक्की दातार, विनोद दातार, निलेश दातार, धनराज दातार, सौरंभ गवळी, प्रतिक इंगोले, कृशाल सुर्य, रावसाहेब खंदारे, रोहन गवळी यांनी परिश्रम घेतले. या धम्म परिषदेचे आयोजन पुज्य भंते बुध्दभूषन व पुज्य भंते संघरत्न यांनी केले होते. सदरील परिषदेला परिसरातील हजारो उपासक उपासिका उपस्थित होत्या.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?