डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. देशात धम्माचा प्रचार प्रसार व्हावा डॉ. बाबासाहेबांनी दिलेले बुद्ध धम्माचे चक्र गतिमान करण्याचे काम झाले पाहिजे.
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२३, परभणी ते चैत्यभूमी (दादर) अशी थायलंड देशातील ११० बुद्ध भंतेजीचा व हजारोंच्या संख्येने धम्म बांधव, महिला पुरुष युवा वर्ग यांचा सहभाग असलेली भव्य बौद्ध धम्म पदयात्रा आयोजित केली होती, व ती यशस्वी रित्या पार पाडली आहे.
या भव्य धम्मपद यात्रेत सहभागी होऊ शकणाऱ्या इच्छुक उपासकानी आपली नाव नोंदणी, दिनांक २५ एप्रिल २०२३ पर्यंत धम्म
पदयात्रा संपर्क कार्यालय शिवाजी कॉम्प्लेक्स बसमत रोड, परभणी येथे करावी. असे आवाहन आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी अमोल घाडवे मो.न. ९७६४१२९३४५ यांच्याशी संपर्क साधावा. धम्म पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धम्म पदयात्रा कोअर कमिटी चे डॉ. प्रकाश डाके, डॉ. बी. टी. धूतमल, प्रा. डॉ. भिमराव खाडे, भिमराव शिंगाडे, भगवान जगताप, प्रा. डॉ. संजय जाधव, राजेश रणखांबे, मंचक खंदारे, पंकज खेडकर, प्रा. डॉ. सुनिल तूरुकमाने, सुधीर कांबळे, चंद्रशेखर साळवे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे आदिने केले आहे
More Stories
“बाह्य हस्तक्षेपाशिवाय तिबेटी बौद्ध समुदायाला पुढील दलाई लामा निवडण्याचा अधिकार असावा” असे स्कॉटिश सरकारचे म्हणणे आहे.
सारनाथ येथील बुद्धांचे पवित्र अवशेष व्हिएतनामला प्रदर्शित
चीनने दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर भिक्षूंना करू शकत नसलेल्या गोष्टींची यादी दिली आहे