डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या लाखो अनुयायांना एक अनोखी भेट मिळाली आहे. बाबासाहेबांचे नाव आता आकाशातील एका ताऱ्याला देण्यात आले आहे.
देशाचे घटनाकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते. आता बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या एका अनुयायाने थेट आकाशातील एका ताऱ्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे ठेवावे, अशी मागणी इंटरनॅशनल स्टार अॅण्ड स्पेस रजिस्ट्री या अमेरिकेतील संस्थेला केली. महत्त्वाचे म्हणजे ही मागणी मान्यही झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेत लोटलेल्या तुफान जनसागराने बाबासाहेबांना अखेरचा निरोप देताना ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा,’ अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, ही घोषणा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी प्रत्यक्षात आणायची असे ठरवले आणि त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले. त्यांनी एक रितसर ऑनलाईन अर्ज अमेरिकेतील इंटरनॅशनल स्टार अॅण्ड स्पेस रजिस्ट्री या संस्थेला
केला. यासाठी शंभर डॉलर्स म्हणजे साधारणपणे नऊ हजार रुपये इतके पैसेही त्यांनी या संस्थेच्या रजिस्ट्रेशन फी साठी पाठवले. ९ फेब्रुवारी रोजी राजू शिंदे यांनी केलेल्या या अर्जाला साधारणपणे एक महिन्यांनी उत्तर आले आणि या संस्थेने आकाशातील एका ताऱ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देत असल्याचे सांगितले. त्यामुळे बाबासाहेबांचे नाव फक्त घोषणेपुरते नाही तर ताऱ्याच्या रुपात प्रत्यक्षात राहाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा तारा आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहाता येणार आहे.
असा बघा तारा
प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अॅप डाऊनलोड करून घेता येईल. अॅपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा सीएक्स २६५२९ यूएस हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव आपल्याला पाहायला मिळू शकेल.
More Stories
“बाह्य हस्तक्षेपाशिवाय तिबेटी बौद्ध समुदायाला पुढील दलाई लामा निवडण्याचा अधिकार असावा” असे स्कॉटिश सरकारचे म्हणणे आहे.
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
सारनाथ येथील बुद्धांचे पवित्र अवशेष व्हिएतनामला प्रदर्शित